एक्स्प्लोर
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बनले सॅन्ताक्लॉज
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्या साध्या स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. पण डोक्यावर सांताक्लॉजची टोपी आणि खांद्यावर भेटवस्तूंचं गाठोडं घेऊन ओबामा वॉशिंग्टनच्या एका कार्यक्रमात पोहोचले. आणि लहान मुला-मुलींना अनेक भेट वस्तू दिल्या.

फोटो सौजन्य : बराक ओबामा ट्वीटर हॅण्डल
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्या साध्या स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. पण डोक्यावर सांताक्लॉजची टोपी आणि खांद्यावर भेटवस्तूंचं गाठोडं घेऊन ओबामा वॉशिंग्टनच्या एका कार्यक्रमात पोहोचले. आणि लहान मुला-मुलींना अनेक भेट वस्तू दिल्या. वॉशिंग्टनमधील लहान मुलांसोबत त्यांनी जवळपास अर्धा तास धमाल केली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या भेटीमुळे लहान मुलं चांगलीच खूश झाली. त्यानंतर थोड्याच वेळात सांतक्लॉजच्या रुपातला बराक ओबामांचा व्हिडीओही ट्विटरवर पोस्ट करण्यात आला. ओबामा यांनीही लहान मुलांसोबतचा फोटो रिट्विट करत आपण हे क्षण खूप आनंदाने साजरे केले असे म्हटलं आहे. दरम्यान, ओबामांच्या या हटके प्रयोगाचं नेटकऱ्यांनीही स्वागत केले आहे. सॅन्ताक्लॉजच्या वेशातील त्यांचा फोटो लाखो यूजर्सनी रिट्वीट केला आहे.
There's no better time than the holiday season to reach out and give back to our communities. Great to hear from young people at the Boys & Girls Club in DC today. pic.twitter.com/FSJkj1qwg9
— Barack Obama (@BarackObama) December 14, 2017
आणखी वाचा























