एक्स्प्लोर
बांग्लादेशमध्ये झाकिर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी
मुंबई: बांग्लादेशमध्ये सध्या वादातीत धर्मगुरू झाकीर नाईकच्या टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. बांग्लादेशातील एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी तरुण झाकीर नाईकच्या भाषणाने प्रेरित झाल्याचे बोलले जात आहे.
पीसी टीव्हीवर बंदीचा निर्णय बांग्लादेश सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत बांग्लदेशचे उच्च सुरक्षा अधिकारी आणि उद्योगमंत्री आमिर हुसैन अमु सहभागी झाले होते.
ढाकामधील 1 जुलै रोजी एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 22 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यातील एक दहशतवादी नाईकच्या भाषणाने प्रेरित झाला होता.
पीसी टीव्हीवरील बंदीसोबतच बांग्लादेश सरकारने देशातील सर्व इमामांना इस्लामिक मूल्यांना तरुणांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, भारतातील केबल ऑपरेटरनाही पीसी टीव्हीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. कारण पीसी टीव्हीच्या प्रसारणासाठी नाईककडे डाउनलिंकचा परवावना नसल्याने या टीव्हीचे प्रसारण अवैध पद्धतीने सुरु आहे. सध्या पीसी टीव्हीचे सर्व कार्यक्रमाचे प्रसारण दुबईमधून होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement