एक्स्प्लोर
हाता-पायाला 31 बोटं असलेल्या बाळाचा जन्म
बीजिंग : सर्वसामान्य मनुष्याच्या हाता-पायाला एकूण 20 बोटं असतात. इतकंच नाही तर हाताला किंवा पायाला जास्तीत जास्त 11 किंवा 12 बोटं असणंही सामान्य मानलं जातं. पण तुम्ही अशा मुलाला पाहिलं आहे का ज्याच्या हाता-पायाची 22 किंवा 24 नाही तर तब्बल 31 बोटं आहेत?
चीनच्या शेनजेन शहरात अशा मुलाचा जन्म झाला आहे, ज्याच्या हात आणि पायाच्या बोटांची एकूण संख्या तब्बल 31 आहे.
मुलाच्या हाताला 10 ऐवजी 15 बोटं आहेत. तर त्याच्या पायांना 16 बोटं आहेत. महत्त्वाचं म्हणजे होंगहोंग नावाच्या या तीन महिन्यांच्या बाळाच्या हाताला अंगठा नाही. त्याऐवजी दोन दोन तळहात आहेत.
हा एक दुर्मिळ आजार असून तो एक हजारांमध्ये एकाला होता. पोलिडेक्टिलिज्म असं या आजाराचं नावं आहे. होंग होंग आई-वडिलांसह चीनच्या पिंगजियांग कौंटीमध्ये राहतो. बाळाची आई शेनजेन शहरातील एका कारखान्यात काम करते. तिलाही पोलिडेक्टिलिज्म आजार आहे.
या बाळाचे आई-वडील त्याच्या उपचारासाठी चांगल्या डॉक्टरच्या शोधात आहे. कारण ही शस्त्रक्रिया अतिशय कठीण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement