Baba Vanga Prediction : 2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर मोठं संकट, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार?
Baba Vanga Predictions 2023 : बल्गेरियातील भविष्यकार बाबा वेंगा यांनी अनेक आश्चर्यकारक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्याला बाल्कनचा नॉस्ट्रेडॅमस म्हटलं जातं. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.
![Baba Vanga Prediction : 2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर मोठं संकट, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? Baba Vanga Prediction for 2023 Did Baba Vanga Predict A Terrifying Nuclear Disaster Read The Viral Story Baba Vanga Prediction : 2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर मोठं संकट, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/a6befe554fa37e88d235467a96627f181701245306749322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Baba Vanga Future Predictions : बल्गेरियातील बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2023 साठी देखील अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांनी 2022 साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 2023 संपायला अजून एक महिना शिल्लक आहे. या काळात पृथ्वीवर मोठं संकट कोसळू शकतं असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं आहे.
2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर मोठं संकट
2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर एक आण्विक आपत्ती येईल, अशी धक्कादायक भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. बाबा वेंगा यांनी अमेरिकेच्या 9/11 हल्ल्याचं कथित भाकीत खरं ठरलं होतं असं सांगितलं जातं. आता 2023 संपण्यापूर्वी मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्फोट होईल, ज्यामुळे विषारी ढग आशियावर स्थिर होतील, असा दावा बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत करण्यात आला आहे.
कोण आहे बाबा वेंगा?
बाबा वेंगा यांची 'बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस' अशी ओळख आहे. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांची दृष्टी गेली. बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. त्यांचं खरं नाव 'वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा' होतं. जे बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली.
मृत्यूनंतर अनेक भविष्यवाणी ठरल्या खऱ्या
मीडिया रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांचा जन्म व्हेंजेलिया पांडेवा दिमित्रोव्हा झाला होता. एका मोठ्या वादळात वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची दृष्टी अचानकपणे गेली होती. काही दिवसांनंतर जेव्हा तिच्या कुटुंबीयांना ती सापडली. या बल्गेरियन महिलेचा मृत्यू अनेक दशकांपूर्वी झाला होता, पण तिच्या मृत्यूनंतर अनेक अंदाज खरे ठरले आहेत. आता, तिचे काही अनुयायी असा दावा करतात की, बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्फोटाचा इशारा दिला होता. ही भविष्यवाणी खरी ठरेल
तिसरं महायुद्ध
2023 मध्ये तिसरं महायुद्ध होऊन मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होईल आणि पैशाचं देखील नुकसान होईल, अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली होती. ही भविष्यवाणी खरी ठरल्याचं मानलं जात आहे. कारण, 2023 मध्ये तिसरं महायुद्ध जरी सुरु झालं नसलं तरी एकीकडे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे हजारो नागरिकांचा बळी गेला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं आहे. ही युद्ध पुढे तिसऱ्या महायुद्धाचं रूप घेऊ शकतात, असं बाबा वेंगा यांनी भाकित केलं आहे.
टीप : बल्गेरियातील बाबा वेंगा यांची भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. या भविष्यवाणीचं एबीपी माझा समर्थन करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)