Killer Whales : व्हेल माशांना मारून टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने का घेतला? शेकडो एकाचवेळी किनारपट्टीवर आल्याने मानवासाठी धोका आहे तरी काय?
तज्ञांच्या मते, बहुतेक व्हेल नेहमी एकत्र राहतात. जर एक व्हेल कुठेतरी अडकली तर इतर सर्व देखील तिच्या मागे जाऊ लागतात. त्यामुळेच समुद्रकिनाऱ्यावर एकाच वेळी अनेक व्हेल मरतात.

Killer Whales : ऑस्ट्रेलियातील टास्मानिया राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी रात्री 150 हून अधिक फॉल्स किलर व्हेल अडकले. त्यापैकी बुधवारी सकाळपर्यंत केवळ 95 जण जिवंत राहिले आहेत. अधिकाऱ्यांनी आता या व्हेललाही मारण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हेल माशांना समुद्रात परत पाठवता आलेलं नाही. बचाव पथकाने त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न केला, पण जोरदार वारा आणि समुद्राच्या लाटांमुळे ते पुन्हा किनाऱ्यांवर परतले.
व्हेल अडकण्याच्या सर्वाधिक घटना तस्मानियाच्या पश्चिम किनारपट्टीवर
या व्हेलचा त्रास कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. टास्मानिया पार्कचे अधिकारी ब्रेंडन क्लार्क यांच्या म्हणण्यानुसार, अवघड भूभागामुळे त्यांच्या बचावासाठी मशीन पाठवता आल्या नाहीत. व्हेल माशांच्या परिसरात न जाण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना केले आहे. येथील आदिवासी समाजासाठी या भागाला खूप महत्त्व आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, व्हेल अडकण्याच्या सर्वाधिक घटना तस्मानियाच्या पश्चिम किनारपट्टीवर घडतात.
व्हेल एकमेकांना संदेश पाठवतात
तज्ञांच्या मते, बहुतेक व्हेल नेहमी एकत्र राहतात. जर एक व्हेल कुठेतरी अडकली तर इतर सर्व देखील तिच्या मागे जाऊ लागतात. त्यामुळेच समुद्रकिनाऱ्यावर एकाच वेळी अनेक व्हेल मरतात. अनेकवेळा व्हेल किनाऱ्यावर येते आणि नंतर संकटात असलेल्या इतर व्हेलला सिग्नल पाठवते. त्या व्हेलकडून सिग्नल मिळाल्यावर इतर व्हेलही त्याच्या जवळ येऊ लागतात आणि अडकतात. पाण्याची पातळी कमी असतानाही ते कधी कधी भरकटतात, असे व्हेल तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कवटीमुळे नाव पडले
इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशननुसार, या व्हेलला फॉल्स किलर व्हेल असे नाव देण्यात आले आहे कारण त्यांच्या कवटीचा आकार किलर व्हेलसारखा आहे. 6 मीटर लांबीपर्यंतची ही प्रजाती लहान डॉल्फिनसारखी वागते. त्यांचे वजन 500 किलो ते 3000 किलो दरम्यान असते. या व्हेल, किलर व्हेल आणि स्पर्म व्हेलसारख्या, कळपात राहायला आवडतात. फॉल्स किलर व्हेल विविध प्रकारचे मासे आणि स्क्विड खातात. कधीकधी ते लहान डॉल्फिन आणि स्पर्म व्हेल देखील खातात.
किनाऱ्यावर राहणाऱ्या मृत व्हेलमुळे मानवाला धोका
- जेव्हा व्हेल मरतो तेव्हा शरीरात असलेले बॅक्टेरिया मिथेन वायू तयार करू लागतात. माशांच्या मृत्यूनंतर ही प्रक्रिया सुरू होते.
- शरीरातून गॅस बाहेर पडू शकत नाही, तेव्हा पोट फुटते.
- व्हेलचे शरीर मोठे असते, त्यामुळे त्यामध्ये अधिक वायू तयार होतो.
- यामुळे व्हेल माशांच्या मृत्यूनंतर त्यांचे पोट वेळीच कापले जाते.
- याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेव्हा मृत व्हेलच्या स्फोटामुळे लोक जखमी झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
