एक्स्प्लोर
Advertisement
पाकच्या सर्वात मोठ्या बँकेची न्यूयॉर्कमधील शाखा बंद
पाकिस्तानला दहशतवादी संघटनांसोबतचे लागेबंधे चांगलेच भोवले आहेत. कारण अमेरिकेतील न्यूयॉर्क वित्तीय विभाग (DFS) ने पाकिस्तानच्या हबीब बँकेच्या न्यूयॉर्कमधील ऑफिसचं शटर डाऊन केलं आहे. तसेच नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेला तब्बल 1400 कोटींचा दंडही ठोठावला आहे.
वॉशिंग्टन : पाकिस्तानला दहशतवादी संघटनांसोबतचे लागेबंधे चांगलेच भोवले आहेत. कारण अमेरिकेतील न्यूयॉर्क वित्तीय विभाग (DFS) ने पाकिस्तानच्या हबीब बँकेच्या न्यूयॉर्कमधील ऑफिसचं शटर डाऊन केलं आहे. तसेच नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेला तब्बल 1400 कोटींचा दंडही ठोठावला आहे.
गेल्याच महिन्यात डीएसफने बँकेला 4 हजार कोटीचा दंड ठोठावण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण आता 1400 कोटीच्या दंडासह बँकेला तत्काळ आपले सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेशही डीएसएफने दिले आहेत.
बँकेकडून मनी लाँण्ड्रिंग प्रकरणात नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचा डीएफएसचा आरोप आहे. डीएफएसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बँकेला आपली चूक सुधारण्याची संधी दिली गेली होती. पण बँकेने त्याकडे दुर्लक्ष केले, अन् चूक सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांना याची मोठी किमत चुकवावीच लागेल.
अधिक माहितीनुसार, अमेरिकेच्या आर्थिक नियामक प्राधिकरणाने हबीब बँकेविरोधात ही कारवाई दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवण्याच्या आरोपावरुन केली आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सर्वात मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.
हबीब बँकेची पाकिस्तानातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख आहे. या बँकेचे मुख्यालय कराचीत असून, या बँकेची जवळपास 24 अब्ज डॉलर म्हणजेच 1.51 लाख कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे. या बँकेची अमेरिकेतील शाखा 1978 मध्ये न्यूयॉर्कमध्ये सुरु करण्यात आली होती. सध्या या शाखेची तब्बल 287 अब्ज डॉलरची उलाढाल आहे.
दरम्यान, पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना खतपाणी घालणं बंद केलं नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच दिला होता. पण तरीही पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना अभय मिळत असल्याने बँकेवर ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement