एक्स्प्लोर
अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघात 555 पैकी 292 महिला खेळाडू

लॉस एंजेलिस : अमेरिकेच्या ऑलिम्पिक समितीने रिओ ऑलिम्पिकसाठी 555 खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या संघात तब्बल 292 महिला खेळाडूंचा समावेश आहे. तर पुरुष खेळाडूंची संख्या 263 आहे. अमेरिकन संघात सर्वाधिक महिला खेळाडू असण्याची ही दुसरी वेळ आहे.
अमेरिकन संघ 27 क्रीडाप्रकारात भाग घेणार असून ते 244 पदकांसाठी खेळतील. या संघातील 191 खेळाडूंनी यापूर्वीच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे.
अमेरिकन खेळाडू मोठ्या प्रमाणावर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात. यावर्षी 555 पैकी 292 महिला या खेळात सहभागी होणार असल्यामुळे एक नवा विक्रम बनला आहे.
या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये 22 पदक विजेता जलतरणपटू मायकल फेल्प्स, टेनिसपटू सेरेना आणि व्हीनस विल्यम्स यांचा समावेश असणार आहे. तसंच सहाव्यांदा सुवर्णपदक मिळवण्यासाठी महिला बास्केटबॉल संघाचाही यात समावेश असेल.
दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे 107 खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचा ध्वजवाहक असेल.
ब्राझिलच्या रिओ दी जानेरोमध्ये 5 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















