एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला झटका; टिकटॉक, वीचॅटवर बंदी घालणारा आदेश जारी

भारताने 59 चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकेनेही चीनला झटका दिला आहे. टिकटॉक, वीचॅट या अॅपवर बंदी घालणाऱ्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.

वॉशिंग्टन : चीनविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी चिनी अॅप टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क असलेल्या कंपनीसोबत कोणताही व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इमरजन्सी इकॉनॉमिक पॉवर अॅक्ट अंतर्गत या आदेशाला मंजुरी दिली. बाईट डान्स या कंपनीकडे टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क आहेत. या आदेशानंतर नंतर अमेरिकेत टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी लागेल.

अमेरिकेच्या अध्यक्षांनी गुरुवारी(6 ऑगस्ट) संध्याकाळी चिनी अॅप टिकटॉक आणि वीचॅटला 45 दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. याआधी अमेरिकन कर्मचाऱ्यांनी टिकटॉक न वापरण्याच्या आदेशाला सीनेटने एकमताने परवानगी दिली होती. बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, "ही बंदी आवश्यक आहे, कारण 'अविश्‍वासार्ह' अॅप जसं की टिकटॉकमधून डेटा एकत्र करणं हा देशाच्या राष्‍ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे."

डोनाल्‍ड ट्रम्प म्हणाले की, "चिनी कम्‍युनिस्‍ट पक्षाला डेटा कलेक्‍शनमुळे अमेरिकेच्या नागरिकांची खासगी आणि मालकी हक्कांसंबंधाची माहिती मिळते. यामुळे चीन अमेरिकेच्या कर्मचारी आणि ठेकेदारांची ठिकाणं ट्रॅक करण्याची परवानगी मिळते. एवढंच नाही तर कम्‍युनिस्‍ट पार्टी वैयक्तिक माहितीचा वापर ब्लॅकमेलिंग किंवा कॉर्पोरेट हेरगिरीसाठी करु शकते.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "जर या कंपनीची विक्री झाली नाही तर 15 सप्टेंबरपर्यंत त्यावर अमेरिकेत बंदी येऊ शकते. तसंच जर याची विक्री झाली तर त्याचा वाटा अमेरिकेच्या करदात्यांनाही मिळायला हवा."

टिकटॉक, मायक्रोसॉफ्ट आणि वीचॅटच्या मालकांनी कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो बुधवार (5 ऑगस्ट ) म्हटलं होतं की, आम्ही ही कारवाई चिनच्या टेक्नॉलॉजीपासून वैयक्तिक अॅपपर्यंत वाढवत आहोत. पॉम्पियो यांनी टिकटॉक आणि वीचॅटचं नावही घेतलं होतं.

दरम्यान गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारत सरकारने 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget