US Panel Report: अमेरिकेने पाकिस्तान, चीनसह 12 देशांना घोषित केले 'विशेष चिंतेचे देश', परराष्ट्र मंत्री म्हणाले - बारकाईने ठेवणार लक्ष
US Panel Report: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले की, अमेरिका जगभरातील प्रत्येक देशाच्या धर्मस्वातंत्र्याच्या किंवा विश्वासाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

IUS Panel Report: अमेरिकेने (America) चीन (China), पाकिस्तान (Pakistan) आणि म्यानमारसह 12 देशांना तेथील धार्मिक स्वातंत्र्याच्या सध्याच्या स्थितीबद्दल "विशेष चिंतेचे देश" म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी याची घोषणा केली. ते म्हणाले की, जगभरातील या देशांतील सरकार आणि गैर-सरकारी घटक लोकांचा त्यांच्या विश्वासाच्या आधारावर छळ करतात, धमकावतात, तुरुंगात टाकतात आणि अगदी ठार मारतात. ब्लिंकन म्हणाले की, अमेरिका जगभरातील प्रत्येक देशाच्या धर्मस्वातंत्र्याच्या किंवा विश्वासाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.
या गैरवर्तनांचे समर्थन नाही - ब्लिंकन
ब्लिंकन म्हणाले की, अमेरिकेकडून चीन, पाकिस्तान आणि म्यानमारसह 12 देशांना तेथील "विशिष्ट चिंतेचे देश" म्हणून घोषित केले आहे. विविध देशांकडून काही घटनांमध्ये, राजकीय फायद्यासाठी तसेच संधींचा फायदा घेण्यासाठी लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य तसेच विश्वासाला प्राधान्य देण्यात येत नाही. ब्लिंकन म्हणाले की, या कृतींमुळे विभाजन होते, आर्थिक सुरक्षितता कमी होते. राजकीय स्थिरता आणि शांतता धोक्यात येते आणि युनायटेड स्टेट्स या गैरवर्तनांचे समर्थन करणार नाही.
कोणते देश ते जाणून घ्या
ब्लिंकन म्हणाले. "आज मी म्यानमार, चीन, क्युबा, इरिट्रिया, इराण, निकाराग्वा, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांना 1998 च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायद्यानुसार या देशांना धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा 1998 अंतर्गत विशिष्ट चिंतेचे देश घोषित करतो" ब्लिंकनने अल्जेरिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, कोमोरोसा आणि व्हिएतनाम या देशांना 'स्पेशल वॉच लिस्ट' मध्ये सूचीबद्ध केले.
या आतंकवादी संघटनांचा समावेश
अमेरिकेने अल-शबाब, बोको हराम, हयात तहरीर अल-शाम, हूथीस, ISIS-ग्रेटर सहारा, ISIS-पश्चिम आफ्रिका, जमात नुसरत अल-इस्लाम वाल-मुस्लिमीन, तालिबान आणि वॅगनर गट या संघटनांची देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये या संघटनेच्या कृतीबाबत "विशेष चिंतेची संघटना" म्हणून घोषित केले गेले आहे. ते म्हणाले की, अमेरिका जगातील प्रत्येक देशातील धार्मिक स्वातंत्र्य किंवा श्रद्धा यांच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येईल
इतर महत्वाच्या बातम्या
FIFA WC 2022 : मेस्सीची 1000 व्या सामन्यात दमदार कामगिरी; अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीत दाखल, ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
