थायलंडला जाणं पडलं महागात! चार दिवसांपासून अडकले 100 हून अधिक प्रवासी; एअर इंडियाकडून निवेदन जारी
Air India Flight in Phuket : एअर इंडिया प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला आहे. 16 नोव्हेंबरचं उड्डाण तांत्रिक समस्येमुळे रद्द करण्यात आली होती.
Air India Flight in Thailand : थायलंडमध्ये गेलेले प्रवासी गेल्या चार दिवसांपासून अडकले आहेत. थायलंडला गेलेले 100 हून अधिक प्रवासी सध्या अडचणीत सापडले आहेत. फुकेतहून नवी दिल्लीला येणाऱ्या विमानातील 100 हून अधिक प्रवासी सध्या थायलंडमध्येच अडकले आहे. या प्रवाशांची फ्लाईट 16 नोव्हेंबरला टेक ऑफ करणार होती, मात्र तांत्रिक समस्येमुळे उड्डाण झालं नाही. 16 नोव्हेंबरला विमानामधील तांत्रिक समस्येमुळे सुरुवातीला फ्लाईट 6 तास उशिराने निघणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, तांत्रिक समस्या सोडवण्यात अपयश आल्यानंतर फ्लाईट रद्द करण्यात आली.
थायलंडला जाणं पडलं महागात!
नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील 100 हून अधिक प्रवासी 80 तासांहून अधिक काळ थायलंडच्या फुकेतमध्ये अडकून पडले आहेत. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, एयर इंडियाचं विमान 16 नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीसाठी उड्डाण करणार होतं, पण तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणासाठी सहा तास उशीर होईल, असं सांगण्यात आलं. प्रवाशांनी पुढे सांगितलं की, अनेक तास वाट पाहिल्यानंतर त्यांना विमानात चढण्यास सांगण्यात आलं, पण तासाभरानंतर त्यांना पुन्हा विमानातून खाली उतरवण्यात आलं आणि विमान उड्डाण रद्द करण्यात आलं.
तीन दिवसांपासून अडकले आहेत 100 हून अधिक प्रवासी
एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत निवेदन जारी केलं आहे. एअर इंडियाने 16 नोव्हेंबरचे विमान तांत्रिक समस्येमुळे रद्द करण्यात आलं आहे. विमान कंपनी एअर इंडियाने सांगितलं आहे की, ग्राउंड स्टाफने प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासह प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. याशिवाय काही प्रवाशांना पर्यायी विमानानेही पाठवण्यात आलं आहे. याशिवाय, प्रवाशांना विमान तिकीटाच्या रक्कमेचा पूर्ण परतावा देण्याचा पर्यायही देण्यात आला होता. एअर इंडियाने असेही म्हटलं आहे की "प्रवासी आणि चालक दलाची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे".
प्रवाशांना दोन-तीन वेळा विमानातून उतरवलं
एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक AI377 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी नवी दिल्लीला रवाना होणार होती. नियोजित वेळेपूर्वी प्रवासी विमानतळावर पोहोचलं. पण, तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईटला उशीर झाला, त्यानंतर प्रवाशांना विमानात चढवण्यात आलं. एकदा विमानाने उड्डाणही केलं, पण विमान परत फुकेत विमानतळावर परतलं. प्रवाशांना अनेक वेळा एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात आलं. चार दिवसांपासून प्रवासी हॉटेलमध्येच अडकून पडले आहेत.
उड्डाणानंतर विमान फुकेतला परतलं
दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी रात्री 8:40 च्या सुमारास प्रवाशांना विमानतळावर आणून विमानात चढवण्यात आले. विमानाने उड्डाण केले, परंतु उड्डाण दरम्यान, काही हवामान आणि काही तांत्रिक त्रुटींमुळे विमानात बिघाड झाला आणि विमान पुन्हा फुकेतला आणण्यात आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :