एक्स्प्लोर
...म्हणून या भारतीय 'चहावाली'चा जगाला हेवा!
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा 'चहावाला' तरुण अरशद खानने आपल्या निळ्या डोळ्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले. त्याचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाल्याने, त्याला चक्क मॉडेलिंगच्याही ऑफर मिळत होत्या. पण सध्या एका भारतीय 'चहावाली'ने इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. उप्पम्मा विर्दी असे या 'चहावाली'चे नाव असून, तिच्या हातच्या चहासाठी ऑस्ट्रेलियातील लोक वेडे आहेत.
मूळची चंदीगढची असलेल्या विर्दीला काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील एका कार्यक्रमात 2016 सालातील 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 26 वर्षीय उप्पम्मा विर्दीची ओळख एक 'चहावाली'च म्हणून नव्हे, तर एक कॉर्पोरेट वकील म्हणूनही ती लोकप्रिय आहे.
काही दिवसांपूर्वी एका टेलिव्हीजनला चॅनेलला मुलाखतीसाठी बोलवले असता, ती चक्क चहाच्या किटलीसोबत, ग्लास घेऊन पोहोचली. सुरुवातीला सर्वांना ती मस्करी करत असल्याचे वाटत होते. मात्र, या माध्यमातून तिने उपस्थितांना मसाला चहाविषयी माहिती दिली.
तिने गेल्या दोन वर्षांपूर्वी चहाचा व्यवसाय सुरु असून ऑस्ट्रेलियात तिचा चहा सर्वाधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, आपले कॉर्पोरेट वकीलीचे कामही तिने सुरुच ठेवले आहे. लोकांच्या मते, विर्दीला तिची मेहनत आणि सोशल मीडियावरील कॅम्पेनच्या प्रसिद्धीमुळे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
वास्तविक, विर्दीचे चहाबद्दलची आत्मियता ही पिढीजात वारशाने मिळाली आहे. विर्दीचे अजोबा आयुर्वेदीक डॉक्टर होते. ते मसाल्यांचे तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. तिच्या अजोबांकडून मिळालेला हा वारसा तिने जोपासला, अन् आता ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. विर्दीच्या मते, चहा हे दोन लोकांमधील मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम आहे.
विर्दीने या कामाची सुरुवात केली, तेव्हा तिच्या कुटुंबियांकडूनही विरोध झाला. कारण, भारतात 'चहावाला' या शब्दाला कमी दर्जाची कामे करणारा व्यक्ती म्हणून ओळखले जाते, असे ते मानत. विर्दी सांगते की, ''माझ्या आई-वडिलांना याबद्दल आक्षेप होता. पण भारतातील प्रत्येक 'चहावाला' एखाद्या उद्योजकांप्रमाणेच आहे. कारण, त्यांच्यामध्येही एखाद्या कसलेल्या उद्योजकाचे गुण असतात.''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement