Khaled Hosseini : 'माझी मुलगी ट्रान्सजेंडर... तिचा मला अभिमान...'; प्रसिद्ध लेखकाचं ट्वीट अन् कौतुकाचा वर्षाव
खालिद होसैनी (khalid hosseini) यांनी ट्विटरवर आपल्या ट्रान्सजेंडर मुलीबद्दल नेटकऱ्यांना माहिती दिली आहे. त्यांच्या या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
Khaled Hosseini : अफगाणी- अमेरिकन (America) लेखक आणि प्रसिद्ध कादंबरीकार खालिद होसैनी (Khaled Hosseini) सध्या त्यांच्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टमुळे चर्चेत आहेत. 'द काइट रनर' आणि 'अ थाउजंड स्प्लिंडिड सन्स' सारख्या बेस्ट सेलर कादंबऱ्यांचे लेखक खालिद होसैनी यांनी ट्विटरवर आपल्या ट्रान्सजेंडर मुलीबद्दल नेटकऱ्यांना माहिती दिली आहे. त्यांच्या या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
खालिद होसैनी यांची पोस्ट
खालिद होसैनी यांनी ट्विटरवर त्यांच्या ट्रान्सजेंडर मुलीबाबत खास ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये 'मुलीचा अभिनमान वाटतो', असं खालिद यांनी लिहिलं आहे. खालिद होसैनी यांची मुलगी 21 वर्षाची आहे. तिचं नाव हारिस आहे. ट्वीटमध्ये खालिद होसैनी यांनी लिहिलं, 'काल माझी मुलगी हारिस ही ट्रान्सजेंडर स्वरुपात माझ्या समोर आली. मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो. माझ्या मुलीनं आमच्या कुटुंबाला शौर्य आणि सत्यबाबत शिकवले. मला माहित आहे की ही प्रक्रिया तिच्यासाठी वेदनादायक होती. पण ती खंबीर आणि निडर आहे.'
Yesterday, my daughter Haris came out as transgender.
— Khaled Hosseini (@khaledhosseini) July 13, 2022
I’ve never been prouder of her. She has taught our family so much about bravery and truth.
I know this process was painful for her. She is sober to the cruelty trans people are subjected to. But she is strong and undaunted. pic.twitter.com/c3qNT1Lndw
खालिद होसैनी यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांच्या मुलीचा बालपणीचा फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो. ती खूप सुंदर आहे. ती हुशार आहे. मी तिच्या कायमसोबत असेन. आमचे पूर्ण कुटुंब तिच्यासोबत असेल.'
I love my daughter. She is beautiful, wise, brilliant. I will be by her side every step of the way. Our family stands behind her. pic.twitter.com/xdJWD4Ikbi
— Khaled Hosseini (@khaledhosseini) July 13, 2022
खालिद होसैनी म्हणतात की हारिसनं प्रत्येक आव्हानाचा सामना भावनिक, शारीरिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या केला आहे. मुलीच्या धाडसाने आणि धैर्याने खालिद होसैनी प्रेरित झाले. खालिद होसैनी यांनी शेअर केलेल्या ट्वीटला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी खालिद आणि त्यांच्या मुलीचे कौतुक केले आहे.
हेही वाचा:
Elon Musk : एलॉन मस्क यांच्या ट्रान्सजेंडर मुलीची वडिलांविरोधात कोर्टात धाव, म्हणाली...