Love Bite Side Effects : गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला दिला 'लव्ह बाइट', या चुकीमुळे प्रियकराने गमावला जीव; जाणून घ्या असं का झालं?
Love Bite : बऱ्याच लोकांसाठी लव्ह बाईट हे प्रेमाचं सिम्बॉल असू शकतं. पण लव्ह बाइट देताना एका चुकीमुळे तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडच्या जीवावर बेतू शकतं. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...
Love Bite Side Effects : आजकाल लव्ह बाइट (Love Bite) प्रेमाचं नवीनचं सिम्बॉल बनत चालले आहे. खरंतर जेव्हा दोन भिन्न जीव एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा लव्ह बाइट अत्यंत सामन्य बाब आहे. परंतु तुम्ही कधी विचार केला आहात का? लव्हा बाईट दिल्यामुळे ती किंवा तो मृत्यूमुखी पडू शकतात. याच लव्ह बाइटची एक भयंकर घटना समोर आली आहे. काही वर्षापूर्वी एका व्यक्तीला त्याच्या गर्लफ्रेंडने लव्ह बाइट दिला आणि तिचा बॉयफ्रेंड मृत्यूमुखी पडला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लव्ह बाइट नेमकं असतं कसं? लव्ह बाइटमध्ये चुकीचं काय आहे? ज्यामुळे एखादी व्यक्ती किंवा तरूणाच्या जीवावर बेतू शकतं. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे एका तरूणाला त्याच्या प्रेयसीने लव्ह बाइट दिल्यामुळे जीव गमवावा लागला आहे.
नेमकं हेच आम्ही सांगणार आहोत की, हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय? या तरुणाचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला होता? यासोबत जेव्हा तुम्ही लव्ह बाइट कराल तेव्हा तुम्हाला काही गोष्टींचं भान ठेवावं लागणार आहे. हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय? याविषयी सविस्तर माहिती घेऊया...
हे लव्ह बाइट नेमकं प्रकरण आहे तरी काय?
जेव्हा ती किंवा तो आपल्या शरीरातील कोणत्याही भागांवर प्रेमानं चुंबन (Kiss) घेतात तेव्हा त्याजागी रक्त जमा होते त्याला लव्ह बाइट, असं म्हणतात. खरंतर, हे प्रकरण काही वर्षापूर्वीचे आहे. जेव्हा मेक्सिको सिटीमध्ये लव्ह बाइटमुळे तरुणाचा नाहक बळी गेला. या प्रकरणात गर्लफेंडने तिच्या बॉयफ्रेंडचे चुंबन घेतल्यामुळे त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यामध्ये तरुण किंवा तरुणी एकमेकांसोबत रोमान्स करतात. ज्यामध्ये शरीरातील कोणत्याही भागावर चुंबन घेतलं जातं आणि तेव्हा रक्तवाहिन्या फाटतात व त्वचेवर लाल डाग पडतात. या प्रकरणात तरूणाच्या गर्लफ्रेंडने त्याला लव्ह बाइट दिला होता. यानंतर त्याच्या शरीरात रक्ताची गुठळी तयार होऊन ही गुठळी मेंदूपर्यंत गेली. यामुळे तरुणाला ब्रेन स्ट्रोक आला. विशेष म्हणजे अशी अनेक प्रकरणे आहेत. ज्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे समस्या निर्माण होतात. या लव्ह बाइटमध्ये ती आणि तो एकमेकांना अत्यंत घट्ट चुंबन घेतात आणि रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यात.
लव्ह बाइटचे साईट-इफेक्ट्स
लव्हा बाईटमुळे शरीरावरील त्वचेवर जखम तयार होऊ शकते. याशिवाय संसर्गजन्य आजार होऊ शकतात. यामुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्ग पसरू शकते. यासोबत काही व्यक्तींच्या शरीरात लोहाची कमतरता असते. यामुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत नाही. अशा लोकांना जर लव्ह बाइट दिला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकतं. याशिवाय लव्ह बाइटमुळे त्वचेच्या संसर्गाचाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी.