New York Bus Accident: न्यूयॉर्कमध्ये 54 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टूर बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, प्रवाशांमध्ये भारतीय पर्यटक
New York Bus Accident : बहुतेक प्रवासी भारतीय, चिनी आणि फिलिपिनो वंशाचे होते. आपत्कालीन प्रतिसादादरम्यान मदत करण्यासाठी अनुवादकांना बोलावण्यात आले.

New York Bus Accident: न्यूयॉर्कमधील आंतरराज्य महामार्गावर 54 प्रवाशांना घेऊन जाणारी एक टूर बसचा भीषण अपघात झाला. या बसमध्ये ज्यामध्ये अनेक भारतीय होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या भीषण अपघातात पाच पर्यटकांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्कमधील बफेलोच्या पूर्वेला सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या पेम्ब्रोक येथे इंटरस्टेट 90 च्या पूर्वेकडे हा अपघात झाला. राज्य पोलिस मेजर आंद्रे रे यांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचे लक्ष विचलित झाल्याने बसवरील नियंत्रण गमावले, ज्यामुळे बस उजव्या बाजूला उलटून अपघातग्रस्त झाली. यांत्रिक बिघाडाची शक्यता नाकारण्यात आली आहे. अपघातातून चालक बचावला आहे आणि तो तपासात सहकार्य करत आहे. बस न्यूयॉर्क शहरातील स्टेटन आयलंड येथील एम अँड वाय टूर इंक द्वारे चालवली जात होती.
A tour bus returning to New York City from Niagara Falls has crashed on an interstate highway, killing and injuring multiple people.
— Chat News Hub (@chatnewshub) August 22, 2025
Local hospital says 21 victims being treated there
Bus crash occured near city of Buffalo
A total of 52 people, including the driver, were on… pic.twitter.com/jQJCHYrInr
प्रवाशांमध्ये भारतीय पर्यटक
बसमध्ये 1 ते 74 वर्षे वयोगटातील प्रवासी होते. घटनास्थळी पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातादरम्यान बसमधून अनेक जण बाहेर काढण्यात आले. डझनभर प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की कोणत्याही गंभीर दुखापती झाल्या नाहीत. बहुतेक प्रवासी भारतीय, चिनी आणि फिलिपिनो वंशाचे होते. आपत्कालीन प्रतिसादादरम्यान मदत करण्यासाठी अनुवादकांना बोलावण्यात आले. गंभीर जखमी प्रवाशांना हलविण्यासाठी मर्सी फ्लाइट मेडिकल ट्रान्सपोर्टने तीन हेलिकॉप्टर तैनात केली होती.
NEW YORK
— Abhay (@AstuteGaba) August 22, 2025
BREAKING - Drone video shows large emergency response to tour bus crash
NYS Police update on fatal bus crash in Pembroke
August 22, 2025
Rollover crash involving tour bus on the New York Thruway leaves multiple dead, others injured
A tour bus returning to New York… pic.twitter.com/QZxKof7Qz6
इतर महत्वाच्या बातम्या
























