एक्स्प्लोर
घरमालक आणि मोलकरणीचं अफेअर, पोपटामुळे पोलखोल
दुबई: पोपट माणसाची नक्कल करण्यात तरबेज आहे. कसल्याही अडचणींशिवाय तो माणसाची भाषा बोलतो. मात्र, कुवेतमधील एका पोपटाची ही क्षमता घरमालकाला चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. कारण, या घरमालकाचे मोलकरणीसेबत सुरु असलेल्या अफेअरची पोलखोल या पोपटाने केली आहे.
अरब टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचा आपल्या पत्नीच्या अनुपस्थितीत मोलकरणीसोबत रंगेलपणा सुरु होता. या दोघांमध्ये अनेक रोमँटिक विषयावर चर्चा होत असे. या सर्व चर्चा त्या घरमालकाचा पोपट ऐकत होता. घरमालकाच्या पत्नीलाही आपला पती आणि मोलकरणीवर संशय होता. पण एका दिवशी पोपटाने त्या महिलेसमोर घरमालक आणि मोलकरणीच्या रंगेलपणाची माहिती महिलेला दिली तेव्हा तिचा संशय खरा ठरला.
यानंतर या महिलेने कुवेत पोलिसात धाव घेत, पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली. या महिलेने आपल्या पतीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी पोपटाची साक्ष ग्राह्य धरण्यास नकार दिला आहे. पोलिसांच्या मते, कोर्टात पोपटाची साक्ष ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे त्यांना ठोस पुराव्याची गरज आहे.
सध्या या व्यक्तीचा तुरुंगवास जरी टळला असला, तरी त्याची चांगलीच गोची झाली आहे. कारण, कुवेतमध्ये कोणत्याही महिलेसोबत अवैध संबंध प्रस्थापित करण्याला गुन्हा मानले असून यावर कडक शिक्षेची तरतूद आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement