एक्स्प्लोर

Washim: खेळताना वीजेची तार हातात धरली अन् खांबाला चिटकली, जोरात किंचाळल्याने अनर्थ टळला, वाशिमच्या अनसिंगमधील घटना

महावितरणकडून खांबांची आणि तारा तसेच विद्यूतप्रवाह असणाऱ्या दोऱ्यांची योग्य देखभाल केली जात नसल्याने अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

Washim:वाशिम जिल्ह्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका एका 7 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला असता. मात्र,  सतर्क नागरिकांच्या प्रयत्नाने वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावल्याचा प्रकार वाशिमच्या अनसिंग इथून समोर आलाय. गावातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका विद्युत खांबाला हालू नये म्हणून तणावासाठी लोखंडी दोर बांधलेला होता. याच दोराला खेळता खेळता  चिमुकलीचा स्पर्श झाला. त्या दोरातून विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने विजेचा जोरदार धक्का बसल्याने चिमुकली तारेला चिकटली आणि जोरात किंचाळली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तिला वेळेत बाजूला केले आणि अनर्थ टळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात वीज वितरणच्या कारभार अनेक ठिकाणी ढेपाळल्यामुळे मागील काही दिवसात विद्युत खंडित राहत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

नेमके घडले काय?

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग गावात 7 वर्षांची चिमुकली घराजवळील रस्त्यावर इतर मुलांसोबत खेळत होती. याच दरम्यान, रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका विद्युत खांबाला हालू नये म्हणून बांधलेल्या लोखंडी तणावाच्या दोराला ती अनवधानाने स्पर्श करती झाली. या दोरातून विद्युत प्रवाह सुरू असल्याने तिला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्क्याने ती तारेला चिटकली.जोरात किंचाळल्याने आजूबाजूचे नागरिक धावत आले.तिची आईही काही क्षणांत तिथे पोहोचली. सतर्कतेने आणि प्रसंगावधान राखत नागरिकांनी तिला तारांपासून दूर केलं. वेळेवर मदत मिळाल्यामुळे तिचा जीव वाचला. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

महावितरणकडून खांबांची आणि तारा तसेच विद्यूतप्रवाह असणाऱ्या दोऱ्यांची योग्य देखभाल केली जात नसल्याने अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महावितरणच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी महावितरणच्या हलगर्जी कारभारावर संताप व्यक्त केला आहे. वीज वाहिन्यांची योग्य देखभाल होत नसल्याने अशा घटना घडत असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा:

Nashik Crime : पुण्याच्या 'वैष्णवी हगवणे'नंतर नाशिकमध्ये 'भक्ती गुजराथी'चा बळी, सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget