Tomato News : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यानं टोमॅटोच्या शेतात सोडल्या मेंढ्या
Tomato News : वाशिम (Washim) जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा भाजीपाला पिकाला बसला आहे.
Tomato News : गेल्या महिन्याभरापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) गारपीट होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. वाशिम (Washim) जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा भाजीपाला पिकाला बसला आहे. जिल्ह्यात टोमॅटो (Tomato) पिकाचेही मोठं नुकसान झालं आहे. अशातच टोमॅटोला दर नसल्यानं शेतकऱ्यांना टोमॅटोच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत.
टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघेना
सध्या बाजारात कोणत्याच भाजीपाला पिकाला दर नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.गेल्या आठ दिवसापूर्वी झालेली गारपीट आणि अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र या संकटातून वाचलेल्या पिकानां भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. सध्टा टोमॅटोच्या दरातही चांगलीच घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या शेतात मेंढ्या सोडायला सुरुवात केली आहे. सरकारनं लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांची केली आहे. जामदरा घोटी शिवारातील शेतकरी जगदेव तडसे या शेतकऱ्यांने आपल्या दोन एकर शेतात टोमॅटोची लागवड केली होती. मात्र अवकाळी पावसामुळं टोमॅटो पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. टोमॅटोला दर नसल्याने त्यांनी टोमॅटोच्या उभ्या शेतीत मेंढ्या सोडल्या आहेत. टोमॅटोला लागणार खर्च तर सोडा मात्र, भाडे आणि मजुरी मिळनेही कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत.
कांदा पिकाचंही मोठं नुकसान
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होत आहे. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसलाय. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळं दरांवर परिणाम झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. अनेक शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचही मोठं नुकसान झालं आहे. एकीकडं अवकाळी पावसाचं संकट तर दुसरीकडं पिकाला दर नसल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: