Wardha Robbery: वाघोडा फार्म हाऊसवरील सशस्त्र दरोडा प्रकरणी तीन आरोपींना अटक; गुन्ह्यातील वाहन देखील जप्त
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे नजीकच्या वाघोडा येथील फॉर्म हाउसमध्ये सशस्त्र दरोडा पडला होता. या प्रकरणी तपासाचे धागेदोरे पुढे गेल्यावर या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे.
वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे नजीकच्या वाघोडा येथील फॉर्म हाउसमध्ये 25 डिसेंबरच्या रात्री सशस्त्र दरोडा (Waghoda Robbery) पडला होता. ज्यामध्ये दरोडेखोरांनी फॉर्म हाउसच्या एका खोलीत तिघांना डांबून 55 पोते सोयाबीन, सोन्याचा ऐवज असा 1 लाख 94 हजारांचा मुद्देमाल पळवला होता. त्यानंतर या प्रकरणी तपासाचे धागेदोरे पुढे गेल्यावर या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. सोबतच पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले वाहन देखील आरोपींकडून जप्त केलेय. वर्धा (Wardha News) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेन ही कारवाई केली.
सागर रतन पवार (38), दीपक रतन पवार (32) दोन्ही रा. चांदुर रेल्वे, मनोज अशोक पवार (32) रा. तरोडा, ता. चांदुर रेल्वे अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या प्रकरणातील उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.
असा घडला होता सशस्त्र दरोडा
नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथे फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊसवर येत असतात. त्यांचे पीक आणि शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊसवर ठेऊन असते. 25 डिसेंबरच्या मध्यरात्री दरम्यान दोन जणांनी त्यांचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी त्यांच्या मुलाने दरवाजा उघडताच पाच ते सहा जण अचानक तेथे आले. त्यांनी अचानक धमकावण्यास आणि मारण्यास सुरुवात केली. यावेळी फार्महाऊसवर नारायण पालीवाल (80 वर्ष), त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल (50 वर्षे) आणि हरिकुमारी पालिवाल (70 वर्ष) हे उपस्थित होते.या झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू खुपसला. तसेच त्याची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील दागिने देखील हिसकावून घेतले. सोबतच तिथे ठेऊन असलेले 55 पोते सोयाबीन लंपास केले होता.
12 दिवसानंतर वेगवेगळ्या गावांतून दरोडेखोरांना अटक
या थरारक घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणी पालिवाल कुटुंबीयांच्या वतीने कारंजा घाडगे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना गंभीर असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा पोलिसांकडून संयुक्तरीत्या तपास सुरू झाला. या तपासात मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून हा गुन्हा तरोडा, मार्डा, चांदुररेल्वे, जि. अमरावती येथे राहणारे सहा गुन्हेगारांनी घटनास्थळी जावुन केल्याचे पुढे आले.
पोलिसांनी सागर रतन पवार (वय 38) रा. शिवाजी नगर, चांदुर रेल्वे, जि. अमरावती याला अटक केली. त्यावेळी हा आरोपी मुंबईला पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्याला अंत्यत शिताफीने अकोला रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेतले. दीपक रतन पवार (वय 32), दोन्ही रा. शिवाजी नगर, चांदुर रेल्वे, जि. अमरावती यास धारणी ते परतवाडा रोडवरील आर.टी.ओ. टोल नाका येथे नाकाबंदी करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. मनोज नशोक पवार (वय 32), रा. मौजा तरोडा, ता. चांदुररेल्वे, जि. अमरावती यास त्याने सदर गुन्हा करण्याकरीता वापर केलेल्या त्याच्या मालकीच्या एमएच 27 बीएक्स 7290 क्रमांकाच्या वाहनासह चांदुर रेल्वे येथुन ताब्यात घेण्यात आले. घटना घडल्या नंतर पोलिसांनी सतत 12 तपास करून तांत्रिक माहितीच्या आधारे तीन आरोपींना वेगवेगळ्या गावांतून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
हे ही वाचा :