Wardha News : आता पोस्टाच्या पाकिटावर वर्ध्याची वायगाव हळद, प्रसिद्धीसाठी टपालखात्याची शक्कल
Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद संपूर्ण देशात प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने भारतीय टपालखात्याच्या वतीने भन्नाट शक्कल लढवण्यात आली आहे. वायगाव हळदीच्या सुगंधासह रंगही देशभरात पसरवण्यासाठी पाऊल टाकण्यात आले आहे.
Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध वायगाव हळदीला देशात प्रसिद्ध करण्यासाठी टपालखात्याने अनोखी शक्कल लढवली आहे. पोस्टाचे पाकीट तयार करून त्यावर वायगाव हळदीच्या माहितीची छपाई करण्यात आली आहे. भारतीय टपाल विभागाच्या पोस्टमास्टर जनरल, नागपूर विभाग प्रमुख शोभा मधाळे यांच्या हस्ते पोस्टाच्या आवरणाचे विमोचन करण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद संपूर्ण देशात प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने भारतीय टपालखात्याच्या वतीने भन्नाट शक्कल लढवण्यात आली आहे. वायगाव हळदीच्या सुगंधासह रंगही देशभरात पसरवण्यासाठी टपालखात्याकडून महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहेे.
"अतुल्य भारत की अमूल्य निधी" या संकल्पने अंतर्गत पोस्टल आवरण म्हणजेच पोस्टाचे पाकीट तयार करून त्यावर वायगाव हळदीची माहिती छपाई करण्यात आलेली आहे. हे पाकीट देशभर प्रसारित होत असल्याने वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळदीस आणखी प्रसिद्धी मिळेल हा या मागचा मुख्य उद्देश आहे. वर्ध्यात विमोचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या पोस्टाच्या आवरणाचे विमोचन भारतीय टपाल विभागाच्या पोस्टमास्टर जनरल, नागपूर विभाग प्रमुख शोभा मधाळे यांच्या हस्ते झाले. हे पोस्ट कार्ड प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांच्या सुपूर्द करण्यात आले.
समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद्यात होते परंपरागत हळद लागवड
शासनाकडून भौगोलिक मानांकन प्राप्त वायगावच्या हळदीची चर्चा सगळीकडेच असते. या हळदीने वायगाव (हळद्या) गावाची ओळख देशपातळीवरच नव्हे, तर जगात पोहोचवली आहे. वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यातील वायगाव व लगतच्या भागात परंपरागत वायगाव हळद पिकाची लागवड करण्यात येते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, वर्धा कार्यालयामार्फत 2016 -17 मध्ये वायगाव हळद पिकाचे भौगोलिक नामांकनासाठी (GI) वायगाव हळद उत्पादक संघामार्फत अर्ज सादर करण्यात आला होता. तालुक्यातील वायगाव गोंड, मुरादपूर, वायगाव हळद्या, नांदुरी, कोरा, साखरा, मंगरूळ, वडगाव, डोंगरगाव, इत्यादी गावांमध्ये वायगावी हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते.
इतर हळदीपेक्षा विशेष काय ?
या हळदीचा रंग इतर हळदीच्या तुलनेत गडद पिवळा असून चवही वेगळी आहे. या हळदीत तेलाचे प्रमाण जास्त असून त्याचा गंधही चांगला आहे. खाद्यपदार्थात अगदी थोडी जरी हळद टाकली तरी पदार्थाचा रंग बदलतो. ही हळद आरोग्यदायी असून रोगप्रतिकारकक्षमता वाढविते. कर्करोग, मेंदूविकार, वातविकार, सर्दी, ताप, खोकला, त्वचाविकार इत्यादींवर ती गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. मुघल काळापासून परंपरागत पद्धतीने जपलेले वाण आहे. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता पूर्णत: नैसर्गिक पद्धतीने घेतलेले पीक आणि त्यामुळेच या हळदीला चांगली मागणीही आहे.
पोस्टाच्या माध्यमातून भारतभर वायगावी हळदीची माहीती
महाराष्ट्रातील (GI) नामांकन प्राप्त वस्तूचे विशेष लोकार्पण करण्याच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळदीचे वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद संपूर्ण देशात प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने भारतीय टपालखाते यांच्यामार्फत "अतुल्य भारत की अमूल्य निधी" या संकल्पने अंतर्गत पोस्टल आवरण म्हणजेच पोस्टाचे पाकीट तयार करून त्यावर वायगाव हळदीची माहिती छपाई करण्यात आलेली आहे. हे पाकीट देशभर प्रसारित होत असल्याने वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळदीस आणखी प्रसिद्धी मिळेल असा मानस आहे.