धक्कादायक! नागरिकांच्या जिवाशी खेळ, भाजी विक्रेत्याने नाल्याच्या पाण्यात धुतली भाजी, Video व्हायरल
Wardha Latest News : वर्ध्यातील एका भाजीपाला विक्रिकेत्याचा व्हिडीओनं खळबळ माजवली आहे. भाजी विक्रेत्यानं चक्क नाल्याच्या पाण्यात भाजी धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Wardha Latest News : वर्ध्यातील एका भाजीपाला विक्रिकेत्याचा व्हिडीओनं खळबळ माजवली आहे. भाजी विक्रेत्यानं चक्क नाल्याच्या पाण्यात भाजी धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हिंगणघाट हरातील मनसे चौक येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या पाण्यामध्ये भाजीविक्रेता भाजी धुत असतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा खळबळजनक व्हीडिओ हजारो नागरिकांनी पहिला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या व्हिडिओमुळे भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेला असून कारवाईची मागणी होत आहे. हिंगणघाट शहरातील मनसे चौकात रस्याच्या कडेला हातगाडीवर मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते आपली दुकानात थाटतात. याच ठिकाणाहून हिंगणघाट शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक भाजीची खरेदी करत असतात. मात्र त्यांच्या नजरेआड असा किळसवाणा प्रकार सुरू असेल असं नागरिकांनी गृहीत धरलं नसेल. मात्र अचानक हा व्हिडिओ नागरिकांसमोर आला आणि एकच खळबळ हिंगणघाट वासियांमध्ये पसरलेली आहे. त्यामुळे अशाप्रकारे नागरिकांचा जीव धोक्यात आणणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
एक भाजी विक्रेता हिंगणघाट शहरातील मनसे चौकातील एका नाल्याच्या पाण्यातून कोथिंबिरीची जुडी बुडवतो आणि झटकून तो परत हात गाडीवर ठेवतो. त्याच्याजवळ असलेल्या अनेक कोथिंबीरीच्या जुड्या तो अशाच प्रकारे नाल्यामध्ये बुडवून चक्क नालीच्या पाण्यातून धुऊन हातगाडीवर ठेवतो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इतका स्पष्ट नागरिकांनी बघितला, त्यामुळे भाजी खरेदी करताना नागरिकांना विचारच करावा लागणार आहे.. एकीकडे पावसाळा सुरू झाला असून अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे, तर अशाप्रकारे भाजी विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याची खेळ सुरू आहे. हे या व्हिडिओतून दिसतंय..
नगरपरिषदेकडून व्हीडिओची दखल :
नगरपालिका प्रशासनाने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेत शासनाच्या अन्न व नागरी औषधी पुरवठा विभागाला उचित कार्यवाही करता पत्रातून कळविले आहे. पत्राद्वारे संबंधित भाजी विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कार्यवाही करावी जेणेकरून कोणी अशा प्रकारचे कृत्य करणार नाही, असे कळविले मात्र अद्याप या भाजीविक्रेत्या कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.