एक्स्प्लोर

Wardha News : वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये आज भाजपची विदर्भस्तरीय मंथन बैठक; मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वातील बैठकीला सुधीर मुनगंटीवार यांची अनुपस्थिती, अनेक चर्चेचा उधाण

Wardha News : वर्ध्यासह विदर्भात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची विभागीय मंथन बैठक आज( 28 जुलै) सेवाग्रामच्या चरखागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.

Wardha News : वर्ध्यासह विदर्भात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची विभागीय मंथन बैठक आज( 28 जुलै) सेवाग्रामच्या चरखागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असून या बैठकीत निवडणुकांबाबत रणनीती ठरविली जाणार आहे. मात्र एकेकाळच्या काँग्रेसच्या जिल्ह्यात आता भाजप मंथन करणार असून या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह अनेक मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहे. सेवाग्राम मध्ये होत असलेल्या भाजपच्या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.

विदर्भातील वरिष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे आजच्या बैठकीत अनुपस्थित राहणार

दरम्यान, वर्ध्याच्या चरखा भवनमध्ये आज भाजपच्या विदर्भातील महत्त्वाचे नेते, मंत्री, आमदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीत सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, विदर्भातील वरिष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे आजच्या बैठकीत अनुपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या गैरहजेरीवरून अनेक चर्चा सध्या रंगू लागली आहे. मात्र सुधीर मुनगंटीवार त्यांच्या पूर्वनिष्चित अशा वैयक्तिक कार्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यामुळे ते वर्ध्यात होणाऱ्या पक्षाच्या विशेष मंथन बैठकीत उपस्थित राहणार नाहीत, अशी खात्रीलायक माहिती आता पुढे आली आहे. मात्र विदर्भात भाजपची विदर्भाच्या विषयांवर महत्त्वाची संघटनात्मक बैठक होत असताना सुधीर मुनगंटीवार त्या बैठकीत अनुपस्थित असणे हा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

.....म्हणून भाजपने वर्ध्यात बैठक घेऊ नये, असं नाही- पालकमंत्री पंकज भोयर

तर दुसरीकडे वर्ध्यात कडवट डाव्या विचारसरणीच्या काही संघटना सक्रिय आहेत, म्हणून उजव्या विचारसरणीच्या भाजपने वर्ध्यात बैठक घेऊ नये असं, निष्कर्ष काढता येत नाही, असे मत गृहराज्यमंत्री व वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी वर्ध्यातील भाजप आमदारांनी वर्ध्यात कडवट डाव्या विचारसरणीच्या संघटना सक्रिय असल्याचं आरोप केलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत भाजपच्या विदर्भातील सुमारे 700 पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक होत आहे.

कडवट डाव्या विचारसरणीच्या नरेटीव्हला पराभूत करण्यासाठीच उजव्या विचारसरणीच्या भाजपची बैठक वर्ध्यात होत आहे का असा प्रश्न एबीपी माझा ने पंकज भोयर यांना विचारला होता. वर्ध्यात काही कडवट डावे कार्यकर्ते सक्रिय असून त्यावर सरकारचा लक्ष आहे. मात्र, कडवट डावी विचारसरणी सक्रिय आहे, म्हणून उजव्या विचारसरणीच्या भाजपने त्या ठिकाणी बैठक घेऊ नये असं त्याचा अर्थ होत नाही असे भोयर म्हणाले. भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून आज मुख्यमंत्री विदर्भातील तयारीचा आढावा घेतील आणि भविष्यात राज्यातील इतर विभागातही अशाच बैठका घेऊन आढावा घेतला जाईल अशी माहिती ही भोयर यांनी दिली.

आणखी वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Womens World Cup Final नवी मुंबईत भारत विरुद्ध द. आफ्रिका लढत रंगणार, विश्वविजयासाठी टीम इंडिया सज्ज
Womens World Cup Final: वनडे वर्ल्डकपमध्ये भारत वि. द.आफ्रिकेत लढत, पावसामुळे सामन्याला उशीर
NEP Debate: 'पहिलीपासून Hindi सक्ती नको, पाचवीपासून सुरू करा', Dr. Narendra Jadhav यांचे स्पष्ट मत
100 Headlines: 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
World Cup Final:  विश्वचषकावर नाव कोरणार, सांगलीतील प्रशिक्षक Vishnu Shinde यांना विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
Nashik Politics: पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
India Women vs South Africa Women, Final: कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
Embed widget