एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कथाकथनातील ‘दादा’ हरपला, ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ कालवश

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि कथालेखक वामन होवाळ यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असं त्यांचं कुटुंब आहे. आज संध्याकाळच्या सुमारास वामन होवाळ यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच त्यांचं निधन झालं. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर यांच्यानंतरच्या पिढीतील प्रमुख कथाकथनकार म्हणून महाराष्ट्र वामन होवाळ यांना ओळखतो. कथाकथनासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहेत. वामन होवाळ हे मूळचे सांगलीतील तडसर गावचे होते. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले. शालेय वयातच कथालेखनाची आवड निर्माण झाली. शंकर पाटील यांच्या लेखनातून कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी पुढे कथालेखन सुरु केले. ऑडिट, बेनवाड, वारसदार, येळकोट, वाटा आडवाटा इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मजल्यांचे घर आणि पाऊसपाणी या कथा इंग्रजी आणि फ्रेंच या भाषेतही अनुवादित झाल्या आहेत. तर जपून पेरा बेणं, आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात ही लोकनाट्येही प्रसिद्ध आहेत. ग्रामीण जगण्यातील खाच-खळग्यांचं निरीक्षण करुन कथालेखन, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. मात्र, सुरुवातीला ग्रामीण कथालेखक अशी ओळख असणाऱ्या वामन होवाळ यांनी पुढे विविध प्रकारांमधील कथा लिहिल्या. वामन होवाळ यांनी कथाकथनाचे महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम केले. घरात ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे होवाळ हे कथाकथनातील खऱ्या अर्थाने ‘दादा’च होते. वामन होवाळ यांच्या निधनाने मराठी साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Embed widget