एक्स्प्लोर

Teachers Constituency Elections : 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार मतदार नोंदणी, शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर

1 ऑक्टोबर पासून नागपूर विभागातील मतदार यादीत आवश्यक कागदपत्रासह नमूना 19 सादर करुन मतदार यादीत मतदारांना नाव नोंदणी करता येईल.

नागपूर :  नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार यादीमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यास पात्र शिक्षक मतदार, शिक्षक संघटना, राजकीय पक्षांना 1 ऑक्टोबर पासून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नावे नोंदणी करता येईल. विहित कालावधीत मतदार यादीत आवश्यक कागदपत्रासह नमूना 19 सादर करुन मतदार यादीत मतदारांना नाव नोंदणी करुन घेता येईल.

अर्हता दिनांक नोव्हेंबर 2022

भारत निवडणूक आयोगाने 5 सप्टेंबर 2016 च्या सर्वसमावेशक सूचनेनुसार शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत. 1 नोव्हेंबर 2022 हे अर्हता दिनांक आहे. यावर आधारित नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार यांद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केले आहे.

30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी

1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द होईल. 15 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनियमान्वये नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी करण्यात येणार. 25 ऑक्टोबर रोजी द्वितीय पुर्नप्रसिध्दी करण्यात येणार. 7 नोव्हेंबर रोजी नमुना 18 व 19 द्वारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिवस. 19 नोव्हेंबर रोजी हस्तलिखित तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई. 23 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी आणि दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर राहील. 25 डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येईल. 30 डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्ध करण्यात येईल.

आधार लिंक करणे एच्छिक

कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्या अनुषंघाने नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या नव्याने तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्जाचा नमूना 19 यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध नमून्याच्या छपाईचे काम सुरुआहे. नमूना 19 मध्ये आधार क्रमांकासाठी रकाना उपलब्ध करुन देण्यात आलेला असून अर्ज विहित कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदाराच्या वतीने ऐच्छिक आहे.

पात्रता असलेल्यांनी नोंदणी करावी

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमानूसार नागपूर विभाग शिक्षक मतदार यादीमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यास पात्र शिक्षक मतदार, शिक्षक संघटना, राजकीय पक्षांनी 1 ऑक्टोबर पासून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नावे नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरु होत असल्याबाबत नोंद घ्यावी. विहित कालावधीत मतदार यादीत आवश्यक कागदपत्रासह नमूना 19 सादर करुन मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न

व्हिडीओ

Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Barve on CJP: 'CJP आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ..' सुनील बर्वेंच्या पोस्टवर ट्रोलिंग; VIDEO वर चाहत्यांचे सवाल
'CJP आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ..' सुनील बर्वेंच्या पोस्टवर ट्रोलिंग; VIDEO वर चाहत्यांचे सवाल
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
Embed widget