Ved : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चे प्रेक्षकांनाही लागलंय वेड.... 'या' पाच कारणांमुळे चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरहिट!
Ved Movie : 'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie Success Story : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या या मराठी सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. कोरोनानंतर प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं आहे. प्रेक्षकांना वेड (Ved Movie Success Story) लावण्यात हा सिनेमा का यशस्वी झाला जाणून घ्या...
रितेश-जिनिलायाची जोडी
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख (Genelia D'Souza) या क्युट कपलच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता असते. गेल्या काही दिवसांपासून चाहते त्यांच्या 'वेड'ची (Ved Movie) आतुरतेने वाट पाहत होते. रितेश-जिनिलिया या क्युट कपलचा ऑनस्क्रीन रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. रितेशने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर जिनिलियाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासोबत मराठी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
'वेड'चा प्रमोशन फंडा (Ved Promotion)
सिनेमाचं प्रमोशन हा त्या सिनेमाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. 'वेड' हा सिनेमा रिलीज होण्याच्या काही महिने आधीच रितेश आणि जिनिलियाने या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली होती. या सिनेमाच्या यशात प्रमोशनचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका, कार्यक्रमांमध्ये जाऊन सिनेमाच्या टीमने प्रमोशन केलं आहे. ग्राऊंड इव्हेन्सवर भरमसाठ खर्च केला आहे. विविध शहरांमध्ये सर्वसामान्यांसोबत प्रमोशन केलं जात आहे. रेडिओ शोज, प्रसारमाध्यमासह सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाला जास्तीत जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकंदरीत आऊटडोअर प्रमोशन करण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे.
'वेड' सिनेमातील गाणी (Ved Movie Songs)
'वेड' हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. 'वेड लागलंय', 'सुख कळले', 'बेसुरी', 'वेड तुझे हे' ही सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना चांगलच वेड लावलं आहे.
'वेड'ची रेकॉर्डब्रेक कमाई (Ved Box Office Collection)
'वेड' या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 20.18 कोटी तर दुसऱ्या आठवड्यात 20.67 कोटींची कमाई केली आहे. 50 कोटींचा टप्पा पार केलेल्या या मराठी सिनेमात नेमकं काय आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळे ते सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा आनंद घेत आहेत.
मजिलीचा रिमेक (Majili Remake)
'वेड' हा सिनेमा 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'मजिली' (Majili) या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या सिनेमा बोलबोला पाहायला मिळाला होता. त्यामुळे आता गाजलेल्या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक पाहायला चाहते उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या