एक्स्प्लोर
Advertisement
रस्त्यावर घडणारा हिंसाचार नव्हे, शेतकऱ्यांच्या पोटातील भूकेची आग : शिवसेना
मुंबई : शेतकरी संपादरम्यान रस्त्यावर घडणारा हिंसाचार नव्हे, तर ती शेतकऱ्यांच्या पोटातील भूकेची आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी एकजुटीचं अभेद्य दर्शन घडवलं आहे. शेतकऱ्यांची ही एकजुट संपूर्ण कर्जमाफी आणि हमीभाव दिल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संपाला संपूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्याच्या लढ्याची ही सुरुवात आहे. शेवटची मागणी मान्य होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र करत महाराष्ट्र बंद ठेवला आहे. या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. शिवाय या बंदला अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.
संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
- शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
- शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement