Railway Budget 2025: हाय स्पीड रेल्वे, नवे मार्ग, कवच यंत्रणा, वंदे भारत रेल्वेची निर्मिती, अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार?
Railway Budget 2025: केंद्राच्या अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्राला काय भेटणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आधुनिकीकरण, एआय तंत्रज्ञानाचा वापर, नव्या वंदे भारत एक्सप्रेस ,अमृत भारत ट्रेन अशा बाबींसाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात, असा अंदाज आहे.

Railway Budget 2025: केंद्राच्या अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्राला काय भेटणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आधुनिकीकरण, एआय तंत्रज्ञानाचा वापर, नव्या वंदे भारत एक्स्प्रेस ,अमृत भारत ट्रेन अशा बाबींसाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात, असा अंदाज आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार याकडे कोट्यवधी भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत. 2025 मध्ये भारतीय रेल्वेचे नेटवर्कला अधिक आधुनिक बनवणे, प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करणे, देशभरात रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवणे, अशा गोष्टींवर भर दिला जाऊ शकतो. सुरक्षा, स्थिरता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर देखील भर दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार प्रवाशांना चांगली सुविधा देणे आणि मालवाहतुकीची सेवा विस्तारित करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकते. याशिवाय बजेटमध्ये नव्या हायस्पीड ट्रेन सुरु करणे, नवी स्टेशन उभारणे, रेल्वे स्टेशनचा विकास करताना पर्यावरणपूरक पद्धतीने करणे यासाठी निर्णय घेतले जाऊ शकतात.
एआयचा होणार वापर
भारतीय रेल्वे कडून तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक वाढवली जाऊ शकते. रेल्वे त्यांच्या विविध यंत्रणांच्या चांगल्या कामगिरीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर भर देण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय रेल्वे कडून मर्यादित प्रमाणात यायचा वापर केला जातो. भारतीय प्रवाशांना सुरक्षित विश्वासार्ह सेवा पुरवण्यासाठी रेल्वेकडून रेल्वेचे रूळ आणि रेल्वे गाड्यांची स्थिती याचं निरीक्षण करण्यासाठी या संचलित यंत्रणेचा वापर केला जाऊ शकतो.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी Linen Inspection and Sorting Assistant (LISA) लॉन्च केले आहे. याचा वापर करून रेल्वेच्या डब्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चादरींचा दर्जा, त्याच्यावरील डाग ऑटोमॅटिक तपासण्यासाठी आणि खराब चादरी वेगळ्या काढण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
रोलिंग स्टॉक (Rolling Stock)
भारतीय रेल्वेने आथिर्क वर्ष 2024-25 मध्ये रेल्वे बजेट मध्ये 54,113 कोटी रुपये रोलिंग स्टॉक साठी दिले होते. 2023-24 च्या तुलनेत 156कोटी रुपयांची तरतूद गेल्यावेळी करण्यात आली होती. रोलिंग स्टॉक रेल्वे सेवा, रुळांची देखभाल यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वाहनांशी आहे. रोलिंग स्टॉक मध्ये रेल्वेचे डबे, लोकोमोटिवस, फ्रिट वॅगनस आणि दुसऱ्या विशेष वाहनांचा समावेश असतो. रेल्वेचे आधुनिकीकरण आणि नेटवर्कच्या विस्तारासाठी रोलिंग स्टॉकला अधिक निधी मिळतो का ते पाहावं लागेल.
LHB कोचची निर्मिती
भारतीय रेल्वे गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर ICF कोच ऐवजी Linke-Hofmann-Busch (LHB) कोचचा वापर करत आहे . 2018 पासून रेल्वे मोठ्या प्रमाणावर एलएचबी कोच बनवत आहे. 2023-24 मध्ये या कोच च्या निर्मितीचे लक्ष्य पूर्ण झालं नव्हते. 2024-25 च्या उत्पादनाबाबत काही माहिती समोर आलेली नाही. सुरक्षितता आणि चांगल्या सुविधा असल्यानं LHB कोचची मागणी वाढत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात LHB कोच निर्मितीवर भर असू शकते.
2025 च्या अर्थसंकल्पात रेल्वे साठी करण्यात येणाऱ्या तरतुदी पैकी एक मोठा हिस्सा अमृत भारत ट्रेन, रेल्वे स्टेशन विकासासाठी असू शकतो.
CRISIL च्या एका रिपोर्टनुसार रेल्वेने गेल्या वीस वर्षात 1लाख किलोमीटर अंतराचे रेल्वे रुळ बनवले आहेत. 44000 किलोमीटर च्या अंतरात कवच लागू केलं आहे. या तंत्रज्ञानासह 50 हजार लोकोमोटिव्स लावण्यासह तीन वर्षात 400 नव्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मितीचे ध्येय असू शकते.
हेही वाचा :
मोठी बातमी! शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयावरुन 5 लाख रुपये होणार?
























