एक्स्प्लोर

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयावरुन 5 लाख रुपये होणार? 

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्याची तयारी करत आहे.

Agriculture News Budget 2025 :  2025 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्याची तयारी करत आहे. KCC मर्यादे संदर्भात सरकारला सतत मागण्या प्राप्त होत होत्या. त्यामुळं या मागणीच्या संदर्भातने सरकार KCC ची मर्यादा 5 लाख रुपये करण्याची शक्यता आहे. 

किसान क्रेडिट कार्ड योजनेबाबत माहिती

किसान क्रेडिट कार्ड योजना 26 वर्षांपूर्वी 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेती व संबंधित कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजाने अल्पमुदतीचे कर्ज दिले जाते. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावरील व्याजावर 2 टक्के सूटही देते. त्याचवेळी, जे शेतकरी संपूर्ण कर्जाची वेळेवर परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून आणखी 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच हे कर्ज शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याजावर दिले जाते. 30 जून 2023 पर्यंत असे कर्ज घेणाऱ्यांची संख्या 7.4 कोटींहून अधिक होती. ज्यावर 8.9 लाख कोटींहून अधिकची थकबाकी दिसली.

कर्ज मर्यादा वाढवल्यास कृषी क्षेत्रातील उत्पादनात वाढ होणार 

शेतीच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. उलट दीर्घकाळापासून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज मर्यादेत कोणतीही वाढ झालेली नाही. बजेटमध्ये KCC मर्यादा वाढवल्यास कृषी क्षेत्रातील उत्पादनात वाढ होईल आणि कृषी उत्पन्नातही वाढ दिसून येईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनशैलीत बदल होण्याबरोबरच त्यांना कर्जाची वेळेवर परतफेडही करता येणार आहे.

लहान शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा उद्देश

किसान क्रेडिट कार्डचा उद्देश लहान शेतकऱ्यांना दिलासा देणे हा आहे. लहान शेतकऱ्यांना  अनुदानित कर्जाचीही नितांत गरज आहे. जेणेकरून त्यांचे उत्पन्नही वाढेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नाबार्ड वित्तीय सेवा विभागाच्या सहकार्याने मोहीमही राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या लोकांनाही कर्ज मिळू शकेल.

किती क्रेडिट कार्ड जारी केले?

नाबार्डच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2024 पर्यंत सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांनी 167.53 लाख किसान क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. ज्यांची एकूण क्रेडिट मर्यादा 1.73 लाख कोटी रुपये होती. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना 11.24 लाख कार्ड जारी करण्यात आले, ज्यांची मर्यादा 10,453.71 कोटी रुपये होती. त्यापैकी 65,000 किसान क्रेडिट कार्ड मच्छिमारांना देण्यात आले, ज्यांची मर्यादा 341.70 कोटी रुपये होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
संकटात दिलासादायक बातमी! 53 लाख LPG सिलेंडर वितरीत, पुरवठा साखळी होणार सुरळीत
संकटात दिलासादायक बातमी! 53 लाख LPG सिलेंडर वितरीत, पुरवठा साखळी होणार सुरळीत
LIC च्या या दोन योजनेत गुंतवणूक करा, आयुष्यभर उत्पन्न मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती  
LIC च्या या दोन योजनेत गुंतवणूक करा, आयुष्यभर उत्पन्न मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती  
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Embed widget