एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

UGC Alert : यूजीसीकडून 20 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर; दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील संख्या सर्वाधिक

या यादीत 20 बनावट विद्यापीठांची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे या यादीत सर्वाधिक बनावट विद्यापीठं ही दिल्लीतील आहेत.

Fake Universities : नुकतेच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागले. अशा वेळी उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश (University admission 2023) घेण्याची स्पर्धा सुरु आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विविध भागांतील एकूण 20 विद्यापीठे 'बोगस' म्हणून घोषित केले आहे. आयोगाने पुढे म्हटले आहे की अशा 'बोगस' विद्यापीठांना कोणतीही पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही. मार्च महिन्यात UGC द्वारे ओळखल्या गेलेल्या सर्वाधिक बोगस विद्यापीठे दिल्लीतील आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. बारावीनंतर अनेक विद्यार्थी विविध कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतात. मात्र प्रवेश घेताना संबंधित कोर्सला मान्यता आहे का, याची पडताळणी होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यूजीसीने बोगस विद्यापीठांची यादीच जाहीर केली. “सध्या देशभरात स्वयंभू आणि मान्यता नसलेली 20 विद्यापीठं यूजीसीच्या नियमांचं उल्लंघन करुन सुरु आहेत. या विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे. त्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही”, असं पत्रक यूजीसीने जारी केलं आहे.

UGC द्वारे ओळखल्या गेलेल्या बोगस विद्यापीठांची यादी

  1. क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर, आंध्र प्रदेश
  2. बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
  3. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस (AIIPHS) राज्य सरकारी विद्यापीठ, अलीपूर, दिल्ली
  4. कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दर्यागंज, दिल्ली
  5. संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, दिल्ली
  6. व्यावसायिक विद्यापीठ, दिल्ली
  7. एडीआर-सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली
  8. भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था, नवी दिल्ली
  9. स्व-रोजगारासाठी विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ, दिल्ली
  10. अध्यात्मिक विश्व विद्यालय (अध्यात्मिक विद्यापीठ), रोहिणी, दिल्ली
  11. बडगनवी सरकार जागतिक मुक्त विद्यापीठ शिक्षण संस्था, गोकाक, बेळगाव, कर्नाटक
  12. सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, किशनट्टम, केरळ
  13. राजा अरबी विद्यापीठ, नागपूर, महाराष्ट्र
  14. श्री बोधी अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, पुद्दुचेरी
  15. गांधी हिंदी विद्यापिठ, प्रयागराज, उत्तर प्रदेश
  16. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर, उत्तर प्रदेश
  17. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ), अलीगढ, उत्तर प्रदेश
  18. भारतीय शिक्षा परिषद, भारत भवन, लखनौ, उत्तर प्रदेश
  19. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता, पश्चिम बंगाल
  20. इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, कोलकाता, पश्चिम बंगाल

इतर महत्वाच्या बातम्या

Ayodhya Ram Mandir: 'या' दिवशी होणार अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, ट्रस्टने मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesar : शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होण्यात तांत्रिक अडचणी - केसरकरMahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVETop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24 नोव्हेंबर  2024: ABP MajhaManoj Jarange Full PC : सरकारने बेईमानी केली तर त्यांना गुडघ्यावर आणू - मनोज जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Embed widget