Amit Thackeray vs Sada Sarvankar: मागे भगवा रंग अन् चार ओळींचा संदेश; वडिलांचा निर्णय मुलानंच सांगून टाकला; माहीममधून तिहेरी लढत अटळ?
Amit Thackeray vs Sada Sarvankar: समाधान सरवणकरांच्या स्टेटसनंतर आता माहीममध्ये आता तिहेरी लढत अटळ असल्याचं बोललं जात आहे. आज शिवसेना आमदार सदा सरवणकर शिवसेना शिंदेगटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
Amit Thackeray vs Sada Sarvankar: विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Nivadnuk 2024) जाहीर झाल्यापासूनच यंदा राज्यात मोठी चुरस पाहायला मिळणार हे स्पष्ट झालं आहे. अशातच, सध्या माहीम मतदारसंघ (Mahim Matdar Sangh) चर्चेत आहे. माहीममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे (Raj Thackeray) सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, त्यांच्या विरोधात महायुतीकडून (Mahayuti) सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरेंकडून महेश सावंत (Mahesh Sawant) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच, महायुतीच्या काही नेत्यांनी माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठींबा जाहीर केला आहे. तेव्हापासूनच मतदारसंघासह संपूर्ण राज्यात माहीममधून तीन टर्मचे आमदार असलेले सदा सरवणकर माघार घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच, सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसनं लक्ष वेधलं आहे.
समाधान सरवणकरांच्या स्टेटसनंतर आता माहीममध्ये आता तिहेरी लढत अटळ असल्याचं बोललं जात आहे. आज शिवसेना आमदार सदा सरवणकर शिवसेना शिंदेगटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं असून उद्या म्हणजे, 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज भरणार असल्याची माहिती दिली आहे. समाधान सरवणकरांनी स्टेटसमध्ये लिहिलं आहे की, "आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी शाखा क्रमांक 194, सामना प्रेस प्रभादेवी इथे उपस्तिथ राहावं..."
माहीममधून तिहेरी लढत अटळ?
29 ऑक्टोबरला सदा सरवणकर शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. सामना प्रेसजवळील शाखेपासून मिरवणूक काढत सदा सरवणकर आज मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. सदा सरवणकरांसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, शिवसेना उबाठाचे महेश सावंत याचं कडवं आवाहन असणार आहे. माहीममधून तीन टर्म आमदार असलेले सदा सरवणकर अमित ठाकरेंसाठी माघार घेणार असल्याचं बोललं जात होतं. पण, समाधान सरवणकरांच्या स्टेटसवरुन सदा सरवणकर निवडणूक अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, अमित ठाकरेंच्या विरोधात महायुतीने उमेदवार न देता, अमित ठाकरेला पाठींबा देण्याची मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. मात्र, सदा सरवणकर आपल्या निर्णयावर ठाम असून ते आज फॉर्म भरणार असल्यानं तिहेरी लढत अटळ असल्याचं बोललं जात आहे.
पाहा राज ठाकरेंचा संपूर्ण राजकीय प्रवास:
Raj Thackeray Profile : व्यंगचित्रकार, शिवसेना ते मनसे; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी
महत्त्वाच्या इतर बातम्या :