अबब! माणसापेक्षाही जास्त उंचीचा आयफोन! पठ्ठ्यानं बनवला 8 फूट उंचीचा iPhone, अमेरिकन यूट्यूबरचा अनोखा कारनामा
Biggest Size iPhone : मिस्टर बीम या अमेरिकन यू-ट्यूबरने 8 फूटाचा जगातील सर्वात मोठ्या आकाराचा आयफोन बनवला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
You Tuber Apple Iphone : जगात सध्या आयफोनची (iPhone) क्रेझ वाढताना दिसत आहे. आयफोनच्या नवनवीन मॉडेल्सची मनाला भुरळ पडते. आयफोनचा आकार साधारणपणे एक फुटापेक्षाही कमी असतो. पण तुम्ही 8 फूट उंचीचा माणसाच्या उंचीपेक्षाही मोठा आयफोन पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावर भल्यामोठ्या आयफोनचा फोटो व्हायरल होत आहे. हा आयफोन माणसापेक्षाही उंच आहे.
आठ फूट आकाराचा आयफोन
एका पठ्ठ्यानं तब्बल 8 फूट उंचीचा सर्वात मोठा आयफोन बनवला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा 8 फुटाचा सर्वात मोठा आयफोन फक्त शोभेसाठी नसून हा मोठा आयफोन सर्वसाधारण आयफोनप्रमाणे व्यवस्थित कार्य करतो. याचा व्हिडीओ यू-ट्यूवर पोस्ट केल्यानंतर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे.
अमेरिकन यूट्यूबरचा पराक्रम
अमेरिकन यू-ट्यूबवर (YouTuber) मॅथ्यू बीमने (Matthew Beem) Apple च्या सर्वात महागड्या फोन iPhone 14 Pro Max चं मॉडेल तयार केलं आहे. विशेष म्हणजे याची लांबी 8 फूट आहे. YouTuber मॅथ्यू बीमने फोन एका कारमध्ये ठेवला आणि त्याचे फिचर्स आणि रिव्ह्यू पाहण्यासाठी तो न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर नेला. हे डिव्हाइसचा डिस्प्ले टेलिव्हिजनच्या टच-स्क्रीनचा वापर करून मॉडेल तयार केलं असून हा मॅक मिनीला जोडलेला आहे.
कसा बनवला सर्वात मोठा आयफोन?
मिस्टर बीमने या भल्या मोठ्या आयफोनमध्ये गाणी ऐकताना व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी बटणंही जोडली आहेत. मिस्टर बीमने त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये एवढा मोठा आयफोन बनवण्याची प्रक्रिया शेअर केली आहे. त्यांनी सांगितलं की, एक मजबूत धातूची फ्रेम तयार करण्यात आली होती. यामुळे हा आयफोन बनवण्यात मदत झाली. YouTuber नंतर iPhone डिव्हाइसला मॅट फिनिश केल्याचं दिसत आहे. यानंतर हा मोठा आयफोन चमकताना तुम्ही पाहू शकता.
भल्या आयफोनमध्ये कोणते फिचर्स?
या सर्वात मोठ्या आयफोनमध्ये साधारण आयफोनमधील सर्व फिचर नाहीत. हा फोन तयार करताना टीव्हीच्या टच स्क्रिनचा वापर करण्यात आला आहे. याला मिनी मॅक जोडण्यात आला आहे. या आयफोनमध्ये लॉक बटण, आवाज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीही बटण जोडण्यात आलं आहे.
गेमिंग आणि व्हिडीओ कॉल सपोर्ट
रिव्हयू करताना बीमने यावर व्हिडीओ गेम खेळला. फोटो काढले इतकंच नाही तर भारतातील एका मित्रासोबत व्हिडीओ कॉलवरून संवादही साधला. सध्या हा 8 फूट आकाराच्या आयफोननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा आठ फूट आकाराचा आयफोन बीमने न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरवला आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.