(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Famous Samosa Viral Video : जगातील सर्वात मोठा समोसा पाहिलाय? तो कापण्यासाठी चक्क चाकू लागतो
Famous Samosa Viral Video : पाऊस सुरू होताच लोक स्वादिष्ट पदार्थांकडे आकर्षित होऊ लागले आहेत
Famous Samosa Viral Video : मान्सूनचे आगमन भारतात झालेले आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून, पाऊस सुरू होताच लोक स्वादिष्ट पदार्थांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. पावसात अशीच एक गोष्ट सर्वांना आवडते आणि ती म्हणजे समोसा...
पावसात गरमागरम समोसे मिळाले तर? सोबतच एक व्यक्ती 4 ते 5 समोसे आरामात खातो, पण आम्ही तुम्हाला असा समोसा दाखवणार आहोत जे खाण्यासाठी 5-7 लोक लागतील आणि तरीही हा समोसा संपणार नाही.
बिगेस्ट समोशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही याला जगातील सर्वात मोठा समोसा देखील म्हणू शकता. हा समोसा एवढा मोठा आहे की, जेव्हा एखादी मुलगी तो खायला गेली तेव्हा तिला हातातही उचलता येत नाही. यानंतर मुलीने समोसे खाण्यासाठी काय केले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
समोसा चाकूने कापला
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये एका ट्रेमध्ये मोठा समोसा ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. टेबलाजवळ एक मुलगीही उभी आहे. समोशाबरोबरच हिरवी आणि लाल चटण्याही ट्रेमध्ये ठेवल्या जातात. मुलीला खाण्यासाठी हातातला समोसा उचलता येत नाही म्हणून ती मोठ्या सुरीने समोसे कापू लागते.
मुलगी कशी हळू हळू चाकूने समोसे कापत आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. समोसा कापल्यानंतर मुलगी तो कापलेला तुकडा हातात घेते आणि कॅमेऱ्यासमोर दाखवते. समोशाचा तुकडा अर्ध्यापेक्षाही किती मोठा दिसतोय हे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
View this post on Instagram
लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला
हा व्हिडिओ फूड ब्लॉगर चाहत_आनंदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. 20 जून रोजी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला ही बातमी लिहिपर्यंत 5.43 लाख लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दोन कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर लोक अनेक कमेंट्सही करत आहेत.
संबंधित इतर बातम्या
- Titanic 2.0 : विशालकाय हिमनगावर धडकलं जहाज, पुढे काय घडलं? पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
- UPSC 2nd टॉपर अतहर आमिर दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ, डॉक्टर मेहरीनशी साखरपुडा
- Viral Video : 'मायेची उब'; दिवंगत वडिलांच्या शर्टांपासून तयार केली गोधडी; मुलीनं दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा