World's Tallest Dog : 'झ्युसी' "ठरला जगातील सर्वाधिक उंच कुत्रा, गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या झ्यूसने गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच कुत्र्याचा किताब पटकावला आहे.

World's Tallest Dog : जगातील सर्वात उंच कुत्रा तुम्ही कधी पाहिला आहे? जर नसेल पाहिला तर हा व्हिडीओ नक्की पाहा. कारण जगातील सर्वात उंच कुत्रा म्हणून याची निवड गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कुत्र्याची लांबी 3 फूट 5.18 इंच आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या झ्यूसने गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच कुत्र्याचा किताब पटकावला आहे.
झ्यूस हा एक ग्रेटडेन प्रजातीचा कुत्रा आहे. या प्रजातीच्या कुत्र्यांची लांबी मोठी असते. ब्रिटनी डेविस हे लहानापासून ग्रेटडेन पाळण्याचे स्वप्न पाहिले होते. लहानपणापासूनच कुत्रा पाळण्याची आवड होती. ब्रिटनीला झ्यूस तिच्या भावाने गिफ्ट केला आहे. ब्रिटनी आणि त्यांचे परिवार टेक्सास येथे राहते. तो तपकिरी आणि राखाडी रंगाचा आहे. अनेक वेळा त्याचा आकार पाहून लोकही आश्चर्यचकित होतात. ग्रेट डेन प्रजातीच्या या कुत्र्याच्या नावावर आता जगातील सर्वाधिक उंच आणि मोठा कुत्रा असल्याचा विश्वविक्रम जमा झाला आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर झ्यूसचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की, झ्युसची लांबी किती आहे. या व्हिडीओमध्ये झ्युस उडी मारताना दिसत आहे. झ्युस आकाराने मोठा आणि लांब आहे. झ्युस ब्रिटनीच्या अतिशय जवळ आहे. तो त्यांच्या परिवारातील एक सदस्य आहे. ब्रिटनी म्हणते, झ्युस हा इतर कुत्र्यांपेक्षा वेगळा असला तरी तो सगळ्यांशी मिळून राहतो.
मीडिया रिपोर्टनुसार, जगातील सर्वात लांब कुत्र्यांचा आहार हा सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक असतो. ब्रिटनी म्हणते, तुम्हाला या प्रजातीचे कुत्रे पाळायचे असेल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे गरजेचे आहे. कारण या कुत्र्याच्या देखभालीसाठी ब्रिटनी यांना लाखो रुपये खर्च येतो. कुत्र्याच्या देखभालीसाठी एक केअर टेकर देखील ठेवला आहे.
संबंधित बातम्या :
विष्णू मनोहरांचा भन्नाट प्रयोग; तांदळाच्या 75 रेसिपी तयार करण्याचा आगळावेगळा विश्वविक्रम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
