Viral Video : 'बुलेट राणी'... घागरा-चोली अन् डोक्यावर पदर, दुचाकी स्वार महिलेचा डॅशिंग अंदाज
Women Riding Bullet Video : एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पारंपारिक पोशाखामध्ये असणारी महिला बुलेट चालवत असल्याचा हा व्हिडीओ आहे.

Bullet Rani Video : तुम्ही कदाचित स्कूटीची एक जाहिरातीमध्ये पाहिली असेल, त्यामध्ये एक प्रसिद्ध डायलॉग आहे की, 'फक्त मुलांनीच मजा का करावी?' (Why should boys have all the fun?) या जाहिरातीमध्ये महिला स्कूटर चालवताना मजा करताना दाखवण्यात आली होती. स्वतंत्र भारतात महिला रस्त्यावर दुचाकी चालवताना दिसणं फारच सामान्य गोष्ट आहे. सलवार-सूट आणि साडी नेसणाऱ्या महिलाही स्कूटर आणि मोटारसायकल चालवतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पारंपारिक पोशाखामध्ये असणारी महिला बुलेट चालवत असल्याचा हा व्हिडीओ आहे.
दुचाकी स्वार महिलेचा डॅशिंग अंदाज
या व्हायरल व्हिडीओमधील महिला सुसाट बाईक चालवताना दिसत आहे. बुलेट चालवताना तिच्या डोक्यावरचा पदर मात्र ती सरकू देत नाही आहे. पारंपारिक वेशातील या बुलेट राणीच्या चेहऱ्यावर गोड हसू देखील फुललं आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या महिलेचं कौतुक केलं आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका महिला बुलेट बाईक चालवत आहे. तिच्या मागे दुसरी महिला बसली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही महिलांनी लेहेंगा-चोली घातली आहे आणि डोक्यावर पदर घेतला आहे. बाईक चालवणाऱ्या महिलेने केशरी चोली आणि हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला असून डोक्यावर केशरी रंगाची ओढणी घेतली आहे. तर मागे बसलेल्या दुसऱ्या महिलेने काळ्या रंगाची चोली, निळ्या रंगाचा घागरा आणि गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे.
'बुलेट राणी'चा व्हिडीओ तुफान चर्चेत
सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल. काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर क्षणाक्षणाला नवनवीन भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामुळे नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होतं. कधी स्टंट, कधी मनोरंजक तर कधी इतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि चर्चेत येतात. अनेकांना या व्हायरल व्हिडीओमुळे प्रसिद्धीही मिळते. सध्या या 'बुलेट राणी'चा व्हिडीओही तुफान चर्चेत आहे. आतापर्यंत लाखो युजर्सने हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक जण या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
