(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : आपापसातच भिडली कोब्राचं झुंड, नागांच्या झुंजीचा व्हिडीओ व्हायरल
Trending Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये चक्क नागांची झुंज पाहायला मिळत आहे.
Trending Video : सोशल मीडिया सध्या मनोरंजनाचं उत्तम साधन बनलं आहे. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी पाळीव प्राण्यांचे तर कधी जंगली प्राण्यांचे, कधी मस्तीचे तर कधी शिकारीचे असे अनेक व्हिडीओ चर्चेत येतात. सोशल मीडियावर कंटेटची कमी कधीच भासत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये चक्क नागांची झुंज पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये किंग कोब्रा या नागांची झुंड आपापसांतच भिडताना पाहायला मिळत आहे. दररोजच्या जीवनात सापांचं किंवा नागांचं दर्शन होणं ही साधी गोष्ट नाही. अशात नागांच्या झुंडीची झुंज लागलेली पाहायला मिळणं म्हणजे फारच आश्चर्याची गोष्ट आहे. यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि शेअर केला आहे.
View this post on Instagram
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सापांच्या सर्वात धोकादायक प्रजातीचा आहे. किंग कोब्रा ही प्रजाती सर्वात विषारी आणि भीतीदायक मानली जाते. या व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्रा सापांची एक झुंड छोट्या झाडावर एकमेकांमध्ये अडकलेले दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सुमारे 5 ते 6 किंग कोब्रा दिसत आहेत, हे साप झाडावर एकमेकांभोवती गुंडाळलेले दिसत आहेत. व्हिडीओ पाहून साप आपापसात भांडत आहेत असे वाटत आहेत.
या झुंजीत काही किंग कोब्रा झाडाच्या अगदी वरच्या टोकापर्यंत पोहोचले आहेत, तर काहींनी तळाशी फणा पसरवला आहे. या संघर्षादरम्यान, वर पोहोचणारा एक किंग कोब्रा अचानक घसरून खाली पडतो. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ कधी आणि कुठला आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या