Mamata Banerjee: राजकारण नाही तर 'या' गोष्टीमधून मिळतेय प्रेरणा.. ममता बॅनर्जींची पोस्ट चर्चेत
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी एक प्रेरणादायी कॅप्शन देखील लिहिले आहे.
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या (West Bangal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) यांनी रविवारी 7 मे रोजी स्वत:चा एक व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी व्यायाम करताना दिसत आहेत आणि त्यांच्या हातात कुत्र्याचं छोटसं पिल्लू देखील आहे. ममता बॅनर्जी या ट्रेडमिलवर चालत असतांना त्यांना त्यांच्या हातात कुत्र्याचं छोटसं पिल्लू धरलं आहे. या व्हिडीओसाठी त्यांनी कॅप्शन लिहित म्हटले आहे की, 'कधीतरी तुम्हांला अधिक प्रेरणा हवी असते.' नेहमी सुरु असणाऱ्या राजकारणांतून थोडी विश्रांती घेत ममता बॅनर्जी त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देताना दिसत आहेत. ममता बॅनर्जींचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओला आतापर्यंत 32,000 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. परंतु या व्हिडीओचे कमेंट सेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या व्हिडीओवर कोणालाही कमेंट करता येत नाही आहे. स्पष्टवक्त्या असणाऱ्या ममता बॅनर्जी या नेहमी भाजपा नेतृत्व करत असलेल्या केंद्र सरकारवर टिका करताना दिसतात. तसेच त्यांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे.
कुस्तीपटूंच्या मुद्द्यावरुन भाजपावर टिका
भारतीय महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंहाविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. महिला कुस्तीपटूंची गुरुवारी पोलिसांबरोबर झालेल्या वादामुळे ममता बॅनर्जींनी भाजपा सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, 'आपल्या मुलींच्या सन्मानाला ठेच पोहचवणं अत्यंत लज्जास्पद आहे.'आंदोलन करणाऱ्या या कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांवर आरोप करत त्यांच्याशी गैरवर्तन केले असल्याचं म्हटलं आहे.
विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे केले आवाहन
आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही ममता बॅनर्जींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी म्हटले होते की 'भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहे, परंतु तपास यंत्रणा मत मिळविण्यासाठी मदत करणार नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा सामना करावा', असे आवाहनही ममता बॅनर्जी यांनी केले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Karnataka Election 2023: कर्नाटकात 'या' जागांसाठी होणार रंगतदार लढत, काय आहे या जागांचं समीकरण?