Viral Video : शाळेमधील विद्यार्थ्यांचे  विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओमध्ये विद्यार्थी गाणी गाताना दिसतात. तर काहींमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नाते दिसते. शाळेमध्ये शिकत असताना अनेकांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत असताना भिती वाटते. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात?  एका महिन्यामध्ये किती दिवस असातात? असे प्रश्न लहान मुलांना  अनेक वेळा विचारले जातात. काही मुलं या प्रश्नांची उत्तरं देतात. पण काही मुलांना मात्र या प्रश्नांची उत्तर माहित नसतात. एका शाळेत शिकणाऱ्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू अनावर झाले. 


 व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पत्रकार शाळेच्या वर्गामध्ये जाऊन विद्यार्थांना प्रश्न विचारतो. 'एका वर्षामध्ये किती महिने असतात?' असा प्रश्न तो एका विद्यार्थीनीला विचारतो. या प्रश्नाला ती विद्यार्थीनी 'चार महिने' असं उत्तर देते. या व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी अनेक विनोदी रिअॅक्शन्स दिल्या आहेत. 


yadavtweeets या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर चार  मिलियन नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, 'कुठून येतात असे लोक?' तर दुसरा नेटकरी म्हणाला,' या ताईला ऑस्कर दिला पाहिजे.'


पहा व्हिडीओ 



 
काही नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडीओला कमेंट करुन त्या विद्यार्थीनीला ट्रोल करणाऱ्या लोकांना सुनावले आहे. 'ज्यांना शाळेत जाण्याची संधी मिळत नाही अशा निरागस लोकांची चेष्टा करू नका.' अशी कमेंट एखा नेटकऱ्यानं केली आहे. 


हेही वाचा :