Viral Video : सध्या अनेक सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडियावर (social media) वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसतात, तर काही व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क होतात. प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  असाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये कुत्र्याची आणि माकडाची मैत्री दिसत आहे. एक चिप्सचं पाकिट घेण्यासाठी ते कुत्र माकडाची मदत करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  


कुत्र्याचा आणि माकडाचा हा व्हिडीओ गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पोस्ट करण्यात आला होता. पण आता पुन्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे ती दुकानाच्या बाहेर  लावलेलं चिप्सचं पाकिट ते माकड घेत आहे. ते पाकिट घेण्यासाठी त्याला कुत्र मदत करत आहे. हा व्हिडीओ  Memes.bks यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला 'हा तुम्ही सर्वात क्युट व्हिडीओ आहे.'






व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी कुत्र्याच्या आणि माकडाच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे.  इंस्टाग्रामवर  2,500 पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. तर  29,000 नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एका नेटकऱ्यानं व्हिडीओला कमेंट केली, 'टीम वर्क' तर दुसऱ्यानं लिहिलं, 'मला माझ्या मित्राची आठवण आली.'ट्वीटरवर या व्हिडीओला कमेंट करुन एक नेटकरी म्हणाला की, 'त्यांना ते चिप्सचं पाकिट मिळालं की नाही?'


हेही वाचा :