Viral Video : आजकाल सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतात. यामध्ये कधी पाळीव प्राण्यांचे तर कधी जंगली प्राण्यांचे व्हिडीओ दिसून येतात. कधी शिकारीचे रोमांचक व्हिडीओ तर मस्ती करतानाचे व्हिडीओही पाहायला मिळतात. या व्हिडीओमुळे युजर्सचं खूप मनोरंजन होतं.


जंगलात आढळणारा महाकाय प्राणी हत्ती दिसायला भयंकर दिसतो. मात्र, या उलट हत्तीची पिल्लं फारच गोंडस आणि खोडकर असतात. अलीकडे हत्ती मानवी वस्तीत रुळताना पाहायला मिळतात. याचे व्हिडीओही अनेक वेळा व्हायरल होतात. सोशल मीडियावर हत्तींच्या पिल्लांचे गोंडस आणि मजेदार व्हिडीओ सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणताना दिसतात.


सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीचं पिल्लू त्याच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीला (Caretaker) त्रास देताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हत्तीचं पिल्लू पायाने गादीवर झोपलेल्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सचं चांगलंच मनोरंजन होत आहे.







हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सम्राट गौडा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये हत्तीचं पिल्लू कुंपणावरून उडी मारून गादीवर झोपलेल्या व्यक्तीकडे धावताना दिसत आहे. मग हत्तीचं पिल्ली त्या व्यक्तीला गादीवरून उठवण्याचा प्रयत्न करते आणि गादीपासून त्या व्यक्तीला दूर करत स्वतः गादीवर झोपताना दिसत आहे.


यानंतर ती व्यक्ती पुन्हा एकदा हत्तीच्या पिल्लाला बाजूला सारत गादीवर झोपते. यामुळे निराश झालेलं हत्तीचं पिल्लू जवळच पडलेल्या पानांच्या ढिगाऱ्यात आपली सोंड मारताना दिसतो. व्हिडीओच्या शेवटी हत्तीचं पिल्लू गादीवर झोपून त्या व्यक्तीसोबत खेळताना दिसत आहे. सध्या छोट्या या गोंडस हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ सोशल मीडियावर यूजर्सची मनं जिंकत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या