Trending Video : सध्या सोशल मीडियावर पाळीव आणि जंगली प्राण्याचे व्हिडीओ अधिक व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. असे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होतं. सध्या  असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सध्या अशाच एका व्हिडओमध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांची  पिल्लांना पाळताना दिसत आहे. हा व्हिडीओ तुमचंही मन जिंकेल एवढं मात्र नक्की. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा चक्क वाघिणीच्या तीन बछड्यांचं संगोपन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत.







व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, एका वन्यजीव अभयारण्यात एक लॅब्राडोर कुत्राच्या कुशीत आणि अंगा-खांद्यावर वाघाचे बछडे खेळताना दिसत आहे. या वाघाचे तीन गोंडस बछडे कुत्र्यासोबत आनंदानं रमताना दिसत आहेत. या दरम्यान वाघाचे बछडे तिला आपली खरी आई मानून तिच्यासोबत मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी कुत्रा शांतपणे पिल्लांसोबत दिसत आहे.


व्हिडीओमध्ये सांगण्यात येत आहे की वाघिणीचा मृत्यू झाल्यानंतर बछड्यांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. बछड्यांची परिस्थिती फार वाईट होती त्यांचा मृत्यूही होऊ शकत होता. अशा परिस्थितीत लॅब्राडोर कुत्र्याने तिन्ही बछड्यांचं संगोपन केले. त्यांची स्वत:च्या पिल्लाप्रमाणे काळजी घेतली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या