Trending Video : आजकाल सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. अनेकदा काही धक्कादायक आणि रोमांचक व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसणं कठीण होत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


जंगलातील हिंसक आणि मोठे वन्य प्राणी इतर छोट्या प्राण्यांची शिकार करुन त्यांना भक्ष्य बनवताना दिसतता. यामध्ये सिंह, वाघ आणि बिबट्या या प्राण्याचं प्रामुख्याने समावेश आहे. हे प्राणी इतर छोट्या प्राण्याची शिकार करतात. त्यामुळे इतर प्राणी या प्राण्यापासून घाबरून दूर पळताना दिसतात.


सहसा जंगलात आढळणारे वन्य प्राणी स्वतःहून कमकुवत प्राण्यांची शिकार करून त्यांना खाताना दिसतात. एखादा जंगली प्राणी दुसऱ्या प्राण्यासोबत शांततेनं एकत्र दिसणं हे क्वचितच पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक बिबट्या नेहमीच्या हिंसक स्वभावा विरुद्ध शांत वृत्तीमुळे खूप चर्चेत आला आहे.







हा व्हिडीओ IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एकाच तलावाच्या काठावर एका बिबट्यासोबत दोन हरिण एकत्र पाणी पिताना दिसत आहेत. यादरम्यान बिबट्या दोघांची शिकार करण्याचा प्रयत्न करत नाही. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.


व्हिडीओ शेअर करताना सुरेंद्र मेहरा यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'वन्य प्राणी कधीही मजा म्हणून शिकार करत नाहीत'. यावरून स्पष्ट होते की, जंगलात राहणारे हिंस्र शिकारी प्राणी भूक लागल्यावरच शिकार करतात. त्याचं पोट भरलेलं असताना, ते खेळ म्हणून शिकार करत नाहीत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या