Viral Video: 'वय केवळ आकडा', 80 वर्षाच्या आजीनं केलं पॅराग्लायडिंग, पाहा व्हिडीओ
नुकताच एक व्हिडीओ सोशल (Social Media) मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये 80 वर्षांची एक आजी पॅराग्लायडिंग करताना दिसत आहेत.
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी संदेश देणारे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या माध्यमातून नेटकरी विविध पोस्ट शेअर करुन लोकांचे मनोरंजन करत असतात. साहसी खेळांचे (Adventure Sports) व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये 80 वर्षांची एक आजी पॅराग्लायडिंग (Paragliding) करताना दिसत आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
समुद्रकिनारी पॅराग्लायडिंग करायला अनेकांना भिती वाटते. पण 80 वर्षाच्या एका आजीनं चक्क साडीमध्ये पॅराग्लायडिंग केलं आहे. सेलिना मोझेस या नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या आजींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटला 1,475 नेटकरी फॉलो करतात. 'माझ्या आजीला हे सिद्ध करायचे होते की, वय हा केवळ आकडा आहे. माझ्या आजीनं 80 व्या वर्षी पॅराग्लायडिंग केलं. मला हा व्हिडीओ फोनमध्ये सापडला. त्यामुळे मी शेअर केला. ती सात वर्षांपूर्वी आम्हाला सोडून गेली. पण तिच्या आठवणी कायम आमच्यासोबत असतील.', असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तसेच स्माईल, बिग हार्ट, गोल्स, होप आणि पॅशन, असे हॅशटॅग या व्हिडीओला देण्यात आले आहेत.
हा व्हिडीओ आता पर्यंत 4.1 मिलियन नेटकऱ्यांनी पाहिला असून या व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स करुन आजींचं कौतुक केलं आहे. व्हिडीओमध्ये अंग्रेजी मीडियम या चित्रपटातील 'एक जिंदगी मेरी' हे गाणं ऐकू येत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
या व्हायरल व्हिडीओला कमेंट्स करुन अनेकांनी व्हिडीओमधील आजीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक आहे. ' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'माझी आजी 85 वर्षांची असताना स्नॉर्कलिंग करत असे. दुर्दैवाने त्या काळातील फक्त फोटो काढले जात होते.' तसेच दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'त्या सुपरवुमन होत्या.' 3 लाख 23 हजारपेक्षा जास्त युझर्सनं या व्हिडीओला लाइक केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Man With 100 Wives : 100 बायकांबरोबर थाटला संसार, 500 मुलांचा 'बाप'; 'या' व्यक्तीची सर्वदूर चर्चा