Trending News : 'खरा मित्र नेहमी....'; केअरटेकरवर नाराज झालेल्या पांडाच्या व्हिडीओनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन
व्हिडीओमध्ये एक पांडा त्याच्या केअरटेकरवर नाराज झालेला दिसत आहे.
![Trending News : 'खरा मित्र नेहमी....'; केअरटेकरवर नाराज झालेल्या पांडाच्या व्हिडीओनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन viral video of cute panda angry with caretaker won everyone heart on social media Trending News : 'खरा मित्र नेहमी....'; केअरटेकरवर नाराज झालेल्या पांडाच्या व्हिडीओनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/f8293089f06541ff24a8af664247322c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Trending News : जंगलामधील काही प्राण्यांची लोकांना भिती वाटते. पण पांडा हा असा प्राणी आहे, ज्याचा स्वभाव अत्यंत प्रेमळ असतो. पांडा हा प्राणी त्याच्या खोडकर आणि प्रेमळ स्वभावानं प्रत्येकाचं मनं जिंकतो. पांडा या प्राण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक पांडा त्याच्या केअरटेकरवर नाराज झालेला दिसत आहे.
प्राणीसंग्रहालयातील या पांडाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पांडा हा त्याच्या केअरटेकरवर नाराज होऊन पळताना दिसत आहे. त्याच्या केअरटेकरपासून दूर जात असताना, तो एका उंच भिंतीपर्यंत पोहोचतो. व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, त्या पांडाचे केअरटेकर त्याचे मागे धावत आहेत.
True friend always help in overcoming #MondayBlues. 😅 pic.twitter.com/jG0yT6MkQo
— Dipanshu Kabra (@ipskabra) May 23, 2022
व्हिडिओ शेअर करुन दीपांशू काबरानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'खरा मित्र नेहमीच तुम्हाला स्वतःवर मात करण्यास मदत करतो.' सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत 2 हजार 800 पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओने यूजर्सची मने जिंकली आहेत. काही नेटकरी व्हिडीओला कमेंट करुन पांडाच्या या क्यूट अंदाजाचे कौतुक करत आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)