Viral Video News : लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान पोपटाचा 'खेळ', रिपोर्टरसोबत केले असे काही...Video व्हायरल
Viral Video News : पोपट कॉपी करताना तुम्ही खूप पाहिलं असेल, पण तुम्ही कधी पोपट चोरी करताना पाहिलं आहे?
Viral Video News : हे जग विविध प्रकारच्या प्राण्यांनी भरलेले आहे. यातील काही प्राणी अतिशय धोकादायक (Animals Viral Video) असतात, तर काही थोडे खोडकरही असतात. तुम्ही पोपट (Parrot Viral Video) पाहिला असेल. ते जितके बुद्धिमान पक्षी मानले जातात, तितकेच ते खोडकरही आहेत. पोपटांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते मानवी आवाजांची नक्कल आरामात करू शकतात आणि केवळ मानवी आवाजच नाही तर इतर अनेक गोष्टींचे आवाज काढण्यात ते पटाईत आहेत. पोपट कॉपी करताना तुम्ही खूप पाहिलं असेल, पण तुम्ही कधी पोपट चोरी करताना पाहिलं आहे का? होय, आजकाल असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हालाही हसू येईल.
Good morning from oodersfield!!!!! @RLWC2021 @Giantsrl The coffee search begins! pic.twitter.com/7xYe71OksY
— Andrew Voss (@AndrewVossy) November 5, 2022
तुम्ही कधी पोपट चोरी करताना पाहिलं आहे का?
या व्हिडिओमध्ये लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान रिपोर्टरच्या कानातून इअरफोन काढून एक पोपट धावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक रिपोर्टर पार्कमध्ये उभा राहून रिपोर्टिंग करत होता. एक पोपट उडत त्याच्या खांद्यावर येऊन बसला असताना परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांबाबत रिपोर्टर सांगत होता. यादरम्यान रिपोर्टरने वार्तांकन करत पोपटाला हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोपट हटण्याचे नाव घेत नव्हता. पोपटाने अचानक कानातला इअरफोन काढला. रिपोर्टरने त्याला पकडले, तोपर्यंत त्याने इअरफोन्स चोरले होते. आता बिचारा रिपोर्टर काय करणार?
पोपटाने कसे चोरले हेडफोन्स?
हा मजेदार व्हिडिओ @Jaynes__World या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 20 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर लोक या व्हिडीओला लाइक करत विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने हे मजेशीर असल्याचे लिहिले आहे, तर दुसर्या युजरने लिहिले आहे की, अशा 'उडत्या गुन्हेगारां'पासून सावध राहा आणि त्वरीत पोलिसांना कळवा.
महत्वाच्या बातम्या :
Viral Video : रस्त्यावर धुम्रपान केल्याची मिळाली कडक शिक्षा, व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही