Viral Video : अमेरिकन मुलांना 'या' भारतीय शिक्षकाचं याड लागलं! गाण्याच्या माध्यमातून शिकवली गणिताची सूत्रे; व्हिडीओ पाहा
Viral Teaching Video: अमेरिकेच्या विद्यार्थ्यांना भारतीय शिक्षक गणिताची सूत्रे अशा पद्धतीने शिकवत आहे की तुम्हीही या विषयाच्या प्रेमात पडाल.
Viral Teaching Video : गणित (Maths) हा असा विषय आहे, जो अनेक मुलांच्या आकलनापलीकडचा आहे. अनेक मुलं गणितात खूप हुशार असतात, पण बहुतेक मुलांसाठी हा विषय भीतीपेक्षा कमी नाही. यामुळेच आजचे शिक्षक मुलांना शिकवण्याचे अनोखे मार्ग शोधतात आणि त्यांना काहीतरी नवीन शिकवतात. सध्या अशाच एका शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे, अमेरिकेच्या विद्यार्थ्यांना भारतीय शिक्षक गणिताची सूत्रे अशा पद्धतीने शिकवत आहे की तुम्हीही या विषयाच्या प्रेमात पडाल.
अमेरिकन विद्यार्थ्यांना गाण्याच्या माध्यमातून शिकवणारे भारतीय शिक्षक
आजकाल अमेरिकेत भारतीय गणित शिक्षकाची शिकवण्याची पद्धत खूप चर्चेत आहे. वास्तविक, या शिक्षकाने अमेरिकन विद्यार्थ्यांना त्रिकोणमितीचे सूत्र लक्षात ठेवण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे, जो लोकांना खूप आवडतो. बाला रेड्डी हे छडी किंवा शिक्षेचा धाक दाखवत नसून गाणी गाऊन विद्यार्थ्यांना गणिताचे सूत्र लक्षात आणून देत आहे. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये शिक्षक गाणी गाऊन विद्यार्थ्यांना फॉर्म्युला लक्षात ठेवायला लावत आहेत, त्याच वेळी, बाला रेड्डी यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थी देखील खूप आनंदी आहेत.
Math also can be fun...Indian teacher teaching Trigonometry in US pic.twitter.com/GnrCT40YEv
— A K 🇮🇳 (@AK_Inspire) October 16, 2022
"गणित इतके मजेदार असेल असे कधीच वाटले नव्हते" युजर्सच्या प्रतिक्रिया
ट्विटरवर @AK_Inspire या हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, गणित इतके मजेदार असेल असे कधीच वाटले नव्हते. अमेरिकेत अशा प्रकारे त्रिकोणमिती शिकवणारे भारतीय शिक्षक प्रथमच पाहतोय, 1 मिनिट 47 सेकंदाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 1 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 25 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. या व्यतिरिक्त युजर्स स्वतःचा फीडबॅक देखील नोंदवत आहेत. एका यूजरने लिहिले की, आम्हाला तर हिटलरसारखा शिक्षक मिळाला होता. त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, मला गणिताचा तिरस्कार आहे. पण मसाबची शिकवण्याची पद्धत खूप मजबूत आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांची शिकवण्याची शैलीही अनेकांना आवडली.
अवघड विषय केला सोपा
बरेच लोक गणित हा एक कठीण विषय मानतात. गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी एकामागून एक फॉर्म्युला आठवावा लागतो, जो फारसा सोपा नाही. तसेच विद्यार्थ्यांना सूत्र सहज लक्षात राहावे यासाठी गणित विषय रोमांचक करणे आवश्यक आहे. यासाठी बाला रेड्डी या भारतीय शिक्षकाने गणिताची अवघड सूत्रे आणि प्रमेयांचे शॉर्टकट पद्धतीने गाण्यात रूपांतर केले.
इतर बातम्या