Pune Rain memes: पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
पुण्याच्या (Pune) पावसाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही नेटकऱ्यांनी मिम्स तयार करुन सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Pune Rain memes: पुण्यात (Pune) परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काल (17 ऑक्टोबर) दुपारनंतर पुण्यात झालेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारंबळ उडवली. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात पावसानं धुमाकूळ घातला. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या पावसाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन काही नेटकऱ्यांनी मिम्स तयार केले आहेत. हे मिम्स तुम्हाला खळखळून हसवतील.
वेगवेगळ्या विषयांवरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.आता काही नेटकऱ्यांनी काल पुण्यात झालेल्या पावसावर देखील भन्नाट मिम्स तयार केले आहेत. एका युझरनं 2017 मध्ये रिलीज झालेल्या न्यूटन या चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांच्या डायलॉगचे मिम तयार केले आहे. हे मिममध्ये लिहिलं आहे, 'पुणेकर उद्या ऑफिसला जाणार? मी लिहून देतो कोणी येणार नाही.'
#punerains
— Vaibhav (@vrushv14) October 17, 2022
Tomorrow office? pic.twitter.com/g2CgcmCwrP
हे मिम देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'बंगळुर, मुंबईनंतर आता पुण्यात...' असं लिहिलेलं या मिममध्ये दिसत आहे.
#punerains
— Vaibhav (@vrushv14) October 17, 2022
After Banglore, Mumbai...
now it's Pune... pic.twitter.com/CK96z6ugLk
#punerains
— Kshitij Vichare (@kshitij_rv) October 17, 2022
Punekars right now: pic.twitter.com/Hh15ipFj0X
'एक दिवसाच्या ब्रेकनंतर पुणेकर पावसाला म्हणताता...' असं कॅप्शन देऊन एक मिम सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं शेअर केलं आहे. या मिममध्ये परेश रावल यांचा 'तू जा रे...' हा डायलॉग लिहिलेला दिसत आहे.
After a break of one day. ⛈️
— Trupti More (@TruptiMore9) October 17, 2022
पुणेकर to the Rain:
#pune #punerains #punerain pic.twitter.com/H6Pi2M1Pmn
पुण्यातील या भागात शिरलं पाणी
येवलेवाडी स्मशानभूमीजवळ सुखसागर नगर, अंबामाता मंदिर कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ सुखसागर नगर, डॉल्फिन चौक बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर हडपसर, गाडीतळ पुण्यातील या भागामध्ये काल पाणी शिरलं होतं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या
Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, दगडूशेठ मंदिरात शिरलं पाणी