एक्स्प्लोर

Viral Video : 105 वर्षाच्या वडीलांसाठी 75 वर्षाच्या आजोबांनी गायलं गाणं; पिता-पुत्राचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Old Man Singing for Father : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये वृद्ध पिता-पुत्रांचं प्रेम दिसून येत आहे. 75 वर्षांचे आजोबा त्यांच्या 105 वर्ष वय असलेल्या वडीलांसाठी गाणं गाताना दिसत आहेत.

Viral Video of Old Man Singing for Father : जगात आई-वडीलांहून कुणीही श्रेष्ठ नाही. जगातलं सर्व सुख एकीकडे आणि आई-वडीलांचं (Parents) प्रेम एकीकडे. आई-वडील ज्या निस्वार्थ भावनेनं आपल्यावर प्रेम करतात ते प्रेम आपल्याला इतर कुणीही देऊ शकत नाही. पण हे सुख प्रत्येकाला मिळत असं नाही आणि ज्याला मिळत त्यापैकी काहींना त्यांची किंमतही नसते. आई-वडीलांच्या वृद्धापकाळात मुलांनी त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण काही जण पैसा आणि धावत्या आयुष्याच्या मागे लागून आई-वडीलांना वृद्धाश्रमात पाठवतात. याचे अनेक फोटो, व्हिडीओ किंवा बातम्याही अनेक वेळेला समोर येतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ काहीसा याच्या उलट आहे. 105 वर्षांच्या वडीलांची काळजी घेत त्यांच्या 75 वर्षाचा मुलगा त्यांच्यासाठी गाणं गाताना दिसत आहे.

105 वर्षाच्या वडीलांसाठी 75 वर्षाच्या आजोबांनी गायलं गाणं

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये वृद्ध पिता-पुत्रांचं प्रेम दिसून येत आहे. 75 वर्षांचे आजोबा त्यांच्या 105 वर्ष वय असलेल्या वडीलांसाठी गाणं गाताना पाहायला मिळत आहे. पिता-पुत्रांचा हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ : वृद्ध पिता-पुत्रांमधील भावनिक क्षण

वृद्ध पित्यासाठी मुलाचं प्रेम पाहून अनेक नेटकरी भावूक

व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजोबा पलंगावर त्यांच्या वृद्ध वडीलांशेजारी बसलेले दिसत आहेत. 75 वर्षांचे आजोबा त्याच्या वडीलांसाठी शिट्टी वाजवत गाणं गात असल्याचं दिसत आहे. वृद्ध पित्यासाठी मुलाचं प्रेम पाहून अनेक नेटकरी भावूक झाले आहेत. व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येक युजरच्या डोळ्यातून जणू आनंदाश्रू वाहत आहेत. 

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये वृद्ध मुलगा वडीलांसाठी गाणं गात त्यांना लहान मुलांप्रमाणे थोपटताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर भावूक कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, 'वृद्ध व्यक्ती ईश्वराप्रमाणे असतात. त्यांची काळजी घेऊन त्यांना प्रेम आणि सन्मानपूर्ण वागणूक द्यायला हवी.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Viral Post : 'तुझी कामाची वेळ संपली, आता घरी जा'; शिफ्ट संपल्यावर 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कम्प्युटरवर येतो मेसेज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Sunetra Pawar and Praful Patel NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Embed widget