![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Viral Post : 'तुझी कामाची वेळ संपली, आता घरी जा'; शिफ्ट संपल्यावर 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कम्प्युटरवर येतो मेसेज
Linkedin Viral Post : एक कर्मचारी ऑफीसमध्ये बसलेला असून त्याच्या कंम्प्यूटरवर 'शिफ्ट संपली आता घरी जा', अशा आशयाचा मेसेज असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![Viral Post : 'तुझी कामाची वेळ संपली, आता घरी जा'; शिफ्ट संपल्यावर 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कम्प्युटरवर येतो मेसेज please go home indore it company employees systems shut down after work hours viral news Linkedin Viral Post Viral Post : 'तुझी कामाची वेळ संपली, आता घरी जा'; शिफ्ट संपल्यावर 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कम्प्युटरवर येतो मेसेज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/bc15594607eaea7df4195e07b3e3a0db1676693299741322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Please Go Home Desktop Warning : ऑफिसमधलं (Office) काम संपत नाही, घरी आल्यावर ही ऑफिसमधून फोन यामुळे अनेक जण त्रस्त असतात. अनेकांना कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ थांबून जास्तीचे कामही करावे लागते. पण जर कामाचे तास पूर्ण झाल्यावर कंपनीच तुम्हाला स्वत:हून घरी जायला सांगत असेल तर... हो, अशीही एक कंपनी आहे, जी शिफ्ट संपल्यावर कर्मचाऱ्यांना घरी जा असा इशारा देते. सोशल मीडियावर (Social Media) या संदर्भातील एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
शिफ्ट संपली आता घरी जा
व्हायरल फोटोमध्ये एक कर्मचारी ऑफिसमध्ये बसलेला असून त्याच्या कम्प्युटरवर 'शिफ्ट संपली आता घरी जा', अशा आशयाचा मेसेज असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमधील कम्प्युटरवर इशारा देणारा मेसेज आहे. यामध्ये लिहिलं आहे की, "तुमच्या शिफ्टची वेळ संपलेली आहे. तुमचा कम्प्युटर 10 मिनिटांमध्ये बंद होईल. कृपया घरी जा.' ही पोस्ट शेअर करत कर्मचाऱ्याने लिहिलं आहे की, "आमच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्याच्या आयुष्य आणि काम यांच्यातील संतुलन राखलं जातं. शिफ्ट संपल्यानंतर काम केल्यास आमचा कम्प्युटर आपोआप बंद होतो."
'या' आयटी कंपनीतील वर्क कल्चर चर्चेत
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट खरी आहे. इंदूरमधील एका आयटी कंपनीमध्ये अशी सिस्टिम आहे, जिथे शिफ्ट संपल्यावर कर्मचाऱ्याला घरी जा असा मेसेज येतो. एचआर स्पेशलिस्ट तन्वी खंडेलवालने लिंक्डइनवर पोस्ट शेअर करत यासंबंधित माहिती दिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "ही जाहिरात किंवा फेक पोस्ट नाही. ही आमच्या Office SoftGrid कंपनीमधील कामाची पद्धत आहे. आमची कंपनी वर्क लाईफ बॅलन्सचे समर्थन करते. कंपनीच्या कर्मचार्यांना शिफ्टनंतर त्यांच्या डेस्कटॉपवर सिस्टिम बंद होईल आता घरी जा, असा मेसेज येतो."
कर्मचार्यांना ऑफिसनंतर कॉल केला जात नाही
तसेच, तन्वीने पुढे लिहिलं आहे की, "कंपनीच्या कर्मचार्यांना ऑफिसनंतर कोणताही मेल आणि कॉल केला जात नाही. अशा वर्क कल्चरमध्ये काम केल्यानंतर, तुमचा मूड चांगला ठेवण्यासाठी तुम्हाला मनडे मोटिव्हेशनची (Monday Motivation) किंवा फन फ्रायडेची (Fun Friday) ची गरज भासत नाही. हे आमच्या कार्यालयातील वास्तव आहे. या काळातही, आम्ही ऑफिसमध्ये Flexible Working Hours आणि आनंददायी वातावरण ठेवण्यावर विश्वास ठेवतो. तुम्हीही आमच्यात सहभागी होऊ शकता.'
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
आयटी कंपनीतील या कामाच्या पद्धतीवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेक युजर्संनी या पद्धतीचं कौतुक केलं आहे, तर काहींनी यावर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने विचारलं की, जर एखादा कर्मचारी महत्त्वाचं काम करत असेल आणि संगणक बंद झाला तर काय होईल. तसेच काहींनी ही पद्धत निरुपयोगी असल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, मला केव्हा काम करायचं आहे, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मला असावा. पण काही नेटकऱ्यांनी या वर्क कल्चरचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)