Catwalk Viral Video: रॅम्प वॉक करताना दोन वेळा आपटली, मग न लाजता घेतला 'हा' भन्नाट निर्णय, 58 वर्षीय सुपरमॉडेलचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर अमेरिकन सुपरमॉडेलचा हाय हील्स सॅंडल घालून रॅम्प वॉक करताना धडपडून पडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Catwalk Viral Video: आपण सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर नेहमीच फॅशन शो बघत असतो. रॅम्प वॉक हा असा शो असो जिथे सर्व मॉडेल्स अगदी हटके कपडे घालून नवनव्या आणि ट्रेन्डिंग फॅशन्स आपल्यासमोर सादर करतात. सध्याच्या नवीन स्टाईल, नवीन फॅशनचा उगम याच शोजमधून होत असतो. स्टायलिस्ट सांगतील तशा प्रकारचे कपडे आणि सॅंडल घालून या मॉडेल्स कॅटवॉक करतात. या सर्व गोष्टी फॉलो करणं कधीकधी मॉडेलसाठी एक प्रकारचं आव्हानच ठरतं, आणि त्यातून काहीवेळा अपघात घडतात. अशाच प्रकारची एक घटना पॅरिसमध्ये नुकतीच घडली असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Catwalk Viral Video: रॅम्प वॉक करताना सुपरमॉडेल दोन वेळा आपटली
पॅरिसमधील वॅलेंटिनोच्या स्प्रिंग 2023 च्या फॅशन शोमध्ये एक 58 वर्षांची अमेरिकन सुपरमॉडेल हाय हील्स सॅंडल घालून रॅम्प वॉक करताना रॅम्पवर पडली. त्यानंतर जे काही घडलं त्याने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे रॅम्प वॉक करताना ही मॉडेल सलग दोनदा पडली. मात्र, त्यानंतर तिने कोणताही विचार न करता सॅंडल काढून हातात घेतलं आणि पुन्हा ती रॅम्प वॉक करायला लागली. आता फॅशन जगतात या घटनेची आणि सुपरमॉडेलची चर्चा चांगलीच चर्चा सुरू आहे. या संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
it’s like every season valentino have an issue with their heels? pic.twitter.com/xtdw84YT3x
— michealla✨ (@PRADAXBBY) January 25, 2023
या 58 वर्षाच्या अमेरिकन सुपरमॉडेलचं नाव क्रिस्टीन मॅक्मेनेमी आहे. क्रिस्टीन मॅक्मेनेमीच्या मॉडेलिंग करियरची सुरूवात 1984 पासून झाली. क्रिस्टीन मॅक्मेनेमी पॅरिसमधील वॅलेंटिनोच्या स्प्रिंग 2023 च्या फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करत होती. त्याच वेळी रॅम्पवर तिचा तोल जाऊन ती खाली पडली. त्यानंतर तीने सॅंडल काढून हातात घेतले आणि पुन्हा रॅम्प वॉक करायला लागली.
Viral Video On Social Media: व्हिडीओ प्रचंड व्हायरल
या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत ट्विटरवर 25.7 मिलीयन म्हणजे तब्बल 2.7 कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 1.27 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर वेगवेगळे कमेंट्स येत आहेत. मुलींनी हाय हील्स सॅंडल घालून चालताना सावध राहावं अशीही कमेंट काहीजणांनी केली आहे.
ही बातमी वाचा: