Viral Video : पाण्यात बोट चालणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पाण्यात प्रवास करण्यासाठी बोटींचा वापर केला जातो. पण विमानतळावर जर कोणी बोट चालवताना दिसले तर तुम्हाला कसे वाटेल? याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होतोय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या


विमानतळावर जर कोणी बोट चालवताना दिसले तर..?
सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ शेअर केले जातात. काही व्हिडिओ इतके मनोरंजक असतात की त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो विमानतळावर शूट करण्यात आला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये चार जण जमिनीवर बसून बोटीप्रमाणे स्वत:ला ओढताना दिसत आहेत. विमानतळाच्या फरशीवर बसलेले चौघेही जणू खरोखरच एखाद्या बोटीवर बसल्यासारखे स्वतःला मागे खेचत आहेत.


 






 


चार अतरंगी मित्रांची कला


या चार अतरंगी मित्रांची कला पाहून पोट धरून हसण्याशिवाय पर्यात नाही, कारण यांनी केलेले कृत्य वेगळे आणि आकर्षक आहे. विमानतळावर त्याच्या आजूबाजूला जाणारा प्रत्येक माणूस त्यांच्या या कृत्याने थक्क होत आहे. या चौघांनी बोट चालवल्याने तेथून जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत आहे. विमानतळावरून जाणारा प्रत्येक प्रवासी त्या चौघांकडे बघण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.


हेही वाचा :