मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तूर्तास आपला अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द केला आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचा विरोध, उत्तर भारतीयांची माफीची मागणी वगैरे राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला. असं असलं तरी सोशल मीडियावर चिमुकल्यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे, ज्यामध्ये तीन चिमुकले राम, सीता आणि हनुमानाच्या रुपात दिसतात.  'द हॅपनिंग महाराष्ट्र' (The Happening Maharashtra) यूट्यूब चॅनेलवरील हा व्हिडीओ आहे. यामध्ये लहान मुलांनी आपली वेगळीच कल्पकता दाखवत स्वतः राम ,सीता आणि मारुतीराया हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचं म्हटलं आहे. 


 राज ठाकरे आपण चांगले काम करत आहात, काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं राम, सीता आणि हनुमानाच्या रुपातील चिमुकले सांगत आहेत. लवकरच राज ठाकरे या चिमुकल्यांना भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालिसा, राम, अयोध्या या मुद्दयावरुन राजकारण पेटलं आहे. हाच धागा पकडून  'द हॅपनिंग महाराष्ट्र'ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 


बाल हनुमान काय म्हणतो? 


बाल हनुमान म्हणतो, "गेले काही दिवस आपल्या महाराष्ट्रात माझे आणि माझ्या प्रभू रामाचे नाव गाजत आहे. जे लोक कित्येक वर्षे माझ्या मंदिरातही नाही आले, ते आता हनुमान चालिसा येत नसली तरी निदान मारुती स्तोत्र तरी मीडियासमोर म्हणत आहेत. हे सगळं तुमच्यामुळे तयार झालेलं आहे. त्याबद्दल आपल्याला आशिर्वाद देतो"


राजसाहेब तुम्ही अयोध्येची जोरदार तयारी करा, आम्ही पाठिशी आहोत, असंही हे चिमुकले या व्हिडीओमध्ये सांगत आहेत. 


VIDEO :